दहावीच्या निकालानंतर तब्बल 4 महिन्यांनी आकारावीचे वर्ग सुरू
नियमित परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ' ओपन टू ऑल' फेरी आयोजित करण्यात आली. या फेरीतून अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 3 लाख 48 हजार 784 एवढी आहे.
 
                                एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
11th online Admission: राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ' ओपन टू ऑल' फेरी अंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. या फेरी अंतर्गत 3 लाख 81 हजार 420 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 48 हजार 784 विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार कॉलेज अलॉट करण्यात आले आहे. कॉलेज अलॉट झालेले विद्यार्थी 8 ऑगस्ट पर्यंत संबंधित कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करू शकतात.दरम्यान, दहावीच्या निकालानंतर तब्बल 4 महिन्यांनी आकारावीचे वर्ग सुरू होणार आहेत.
राज्यातील 95 25 कॉलेजमधील 21 लाख 50 हजार 130 जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या जागांसाठी आतापर्यंत 14 लाख 55 हजार 945 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील आठ लाख 82 हजार 81 एवढ्या विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. मात्र, नियमित परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ' ओपन टू ऑल' फेरी आयोजित करण्यात आली. या फेरीतून अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 3 लाख 48 हजार 784 एवढी आहे. तर आतापर्यंत 8 लाख 82 हजार 81 विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या 14 लाख 55 हजार 945 विद्यार्थ्यांपैकी या फेरी अखेरीस जास्तीत जास्त एकूण 12 लाख 30 हजार 865 विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.उर्वरित 2 लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार आहेत.
राज्यातील दोन लाखाहून अधिक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार हे निश्चित आहे. मात्र, 11 ऑगस्ट पासून अकरावीचे वर्ग सुरू करणे आवश्यक आहे, अशा सूचना राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत. दहावीचा निकाल 13 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर तब्बल दोन महिने विद्यार्थी घरी बसून होते. चौथा महिना उजाडल्यावर आता 11 ऑगस्ट रोजी म्हणजेच येत्या सोमवारपासून अकरावीचे वर्ग सुरू होणार आहे.
 
                         eduvarta@gmail.com
                                    eduvarta@gmail.com                                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
                                        
                                     
            
             
            
            