CBSE कडून इयत्ता 10वी, 12वीच्या कौशल्य विषयांचे नमुना पेपर प्रसिद्ध
कौशल्याशी संबंधित विषय घेणारे विद्यार्थी cbseacademic.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन हे नमुना पेपर डाउनलोड करू शकतात.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने सत्र 2024-25 मध्ये 10वी आणि 12वीच्या वर्गात (10th and 12th class) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्याशी संबंधित विषयांचे नमुना पेपर (Skills sample paper) प्रसिद्ध करण्यात आले आहेत. कौशल्याशी संबंधित विषय घेणारे विद्यार्थी cbseacademic.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन हे नमुना पेपर डाउनलोड करू शकतात. या नमुना पेपर द्वारे उमेदवारांना प्रश्नपत्रिका नमुना, मार्किंग, परीक्षेचा नमुना यांसारखी माहिती मिळू शकते, जी विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षांची तयारी करण्यास मदत करेल.
2025-26 या सत्रापासून वर्षातून दोनदा इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा आयोजित करण्यासाठी देशभरातील शिक्षण मंत्रालय आणि CBSE शाळांमध्ये एक करार झाला आहे. CBSE सत्र 2025-26 पासून वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेईल. पहिल्या टप्प्यातील परीक्षा एप्रिल महिन्यात, तर दुसऱ्या सत्राच्या बोर्डाच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेतल्या जातील. 2026 मध्ये प्रथमच वर्षातून दोन वेळा परीक्षा होणार आहेत.
अशा प्रकारे नमुना पेपर डाउनलोड करा
CBSE कौशल्य शिक्षण नमुना प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला cbseacademic.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. वेबसाइटच्या होम पेजवर गेल्यानंतर नमुना प्रश्नपत्रिकेच्या लिंकवर क्लिक करावे लागेल. आता नवीन पेजवर तुम्हाला तुमच्या वर्गानुसार ज्या विषयाचा पेपर डाउनलोड करायचा आहे त्यावर क्लिक करा. यानंतर, नमुना प्रश्नपत्रिका स्क्रीनवर PDF स्वरूपात उघडेल जिथून तुम्ही ती डाउनलोड करून सेव्ह करू शकता.
eduvarta@gmail.com