फास्ट ट्रॅक स्टुडंट व्हिसा रद्द ; भारतीय विद्यार्थ्यांवर परिणाम होणार ?

14 देशांतील पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यांसाठी व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने 2018 साली 'स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम' (SDS) कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. या 14 देशांमध्ये भारताचाही समावेश होता.  या कार्यक्रमांतर्गत केवळ व्हिसा प्रक्रियाच सुलभ झाली नाही तर मंजुरीचे दरही कमी करण्यात आले होते. 

फास्ट ट्रॅक स्टुडंट व्हिसा रद्द ;  भारतीय विद्यार्थ्यांवर परिणाम होणार ?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. भारतीयांसाठी डेस्टिनेशन असलेल्या कॅनडाच्या सरकारने आपला लोकप्रिय 'फास्ट ट्रॅक विद्यार्थी व्हिसा' कार्यक्रम रद्द केला आहे (The Canadian government has canceled its popular 'fast track student visa' program) कॅनडा सरकारच्या या निर्णयाचा परिणाम भारतीय विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणावर होईल असे चित्र दिसून येत आहे. (This decision will have a huge impact on Indian students)