विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षक भरतीचे नियम बदलणार; UGC कडून तयारी सुरू
UGC किमान पात्रता राखण्यासाठी 2018 च्या नियमात बदल करण्याची तयारी करत आहे आणि विद्यापीठे/महाविद्यालयांमध्ये शिक्षक आणि इतर शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी मानके ठरवत आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विद्यापीठ अनुदान आयोग (University Grants Commission) UGC लवकरच 'UGC फॅकल्टी रिक्रूटमेंट रेग्युलेशन' चा मसुदा आणण्याच्या तयारीत आहे. (UGC is preparing to bring out a draft of 'Faculty Recruitment Regulations') हा नियम लागू झाल्यानंतर महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील नोकरभरतीच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. (After the implementation of this rule, there will be changes in the recruitment rules in colleges and universities)
हा नियम लागू झाल्यानंतर, उद्योजकता स्टार्टअप आणि उद्योग सहभाग यासारख्या नवीन क्षेत्रांची आवड असलेल्या पदव्युत्तर पदवीधारकांची थेट महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते, अशी माहिती यूजीसीचे अध्यक्षा एम. जगदीश कुमार यांनी दिली आहे.
UGC किमान पात्रता राखण्यासाठी 2018 च्या नियमात बदल करण्याची तयारी करत आहे आणि विद्यापीठे/महाविद्यालयांमध्ये शिक्षक आणि इतर शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी मानके ठरवत आहेत. जुन्या नियमानुसार,आतापर्यंत चार वर्षांची पदवी/पीएचडीसह पीएचडी ही भरतीसाठी किमान पात्रता आहे. यासोबतच या नियमानुसार पदवी/पदव्युत्तर आणि पीएचडी एकाच विषयातून असणे बंधनकारक आहे.
आता त्यात बदल करण्याची तयारी सुरू आहे. गेल्या ६ महिन्यांत यावर सविस्तर आढावा घेण्यात आला असून त्यानंतर मसुदा तयार करण्यात आला आहे, असेही जगदीश कुमार म्हणाले.