IIT मुंबईचे तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द
यापूर्वी, आयआयटी रुरकीने तुर्कीतील इनोनू विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार औपचारिकपणे रद्द केला होता. "संस्था तिच्या शैक्षणिक प्राधान्यांना प्रतिबिंबित करणाऱ्या आणि राष्ट्रीय हिताची सेवा करणाऱ्या जागतिक सहकार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे," असे आयआयटी रुरकीने एक्स वर पोस्ट केले होते. तर चंदीगड विद्यापीठासारख्या खाजगी संस्थांनी २३ तुर्की आणि अझरबैजानी विद्यापीठांसोबतचे शैक्षणिक सहकार्य संपवले आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
भारतासोबत वाढत्या तणावादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर देशातील महत्वाच्या शिक्षण संस्थांनी तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले आहेत. (All agreements with Turkish universities canceled) आता या यादीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई (Indian Institute of Technology Mumbai) (आयआयटी मुंबई) चा देखील समावेश झाला आहे.
संस्थेने त्यांच्या अधिकृत X हँडलवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "तुर्कीशी संबंधित सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे, आयआयटी बॉम्बे पुढील सूचना मिळेपर्यंत तुर्की विद्यापीठांसोबतचे करार स्थगित करण्याच्या प्रक्रियेत आहे." ही संस्था सध्या काही तुर्की संस्थांसोबत प्राध्यापक विनिमय कार्यक्रम चालवत आहे.
यापूर्वी, आयआयटी रुरकीने तुर्कीतील इनोनू विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार औपचारिकपणे रद्द केला होता. "संस्था तिच्या शैक्षणिक प्राधान्यांना प्रतिबिंबित करणाऱ्या आणि राष्ट्रीय हिताची सेवा करणाऱ्या जागतिक सहकार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे," असे आयआयटी रुरकीने एक्स वर पोस्ट केले होते. तर चंदीगड विद्यापीठासारख्या खाजगी संस्थांनी २३ तुर्की आणि अझरबैजानी विद्यापीठांसोबतचे शैक्षणिक सहकार्य संपवले आहे.
दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षात तुर्की ने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचा परिणाम म्हणून सुरूवातीला भारतीय पर्यटकांनी तुरकीचे तिकीट रद्द केली होती. त्यानंतर भारतीय व्यापाऱ्यांनी तिथल्या वस्तूंवर बहिष्कार टाकला. आता शिक्षण क्षेत्रातून देखील अशीच माहिती समोर येत आहे. देशातील आघाडीच्या शैक्षणिक संस्था तुर्कीसोबतचे त्यांचे शैक्षणिक करार स्थगित केले आहेत.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), दिल्ली विद्यापीठ (DU) जामिया मिलिया इस्लामिया (JMI) आणि छत्रपती शाहू जी महाराज विद्यापीठ (CSJMU), कानपूर यांनी तुर्की विद्यापीठांसोबतचे अनेक शैक्षणिक करार रद्द केले आहेत.