कोल इंडिया लिमिटेडमध्ये 640 पदांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया उद्यापासून सुरु
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीच्या पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या अर्जदारांचे अर्ज स्वीकारण्याची पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे त्यांच्याकडे GATE म्हणजेच पदवीधर अभियोग्यता चाचणी गुण असणे आवश्यक आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्र सरकारची महारत्न कंपनी म्हटल्या जाणाऱ्या कोल इंडिया लिमिटेडमध्ये (COAL INDIA LIMITED) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीच्या 640 पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Notification released for the recruitment of 640 posts of Management Trainee) ही पदे भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया 29 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे (The application process will start from 29th October) . पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी 28 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतील. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने करता येतील.
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीच्या पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या अर्जदारांचे अर्ज स्वीकारण्याची पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे, त्यांच्याकडे GATE म्हणजेच पदवीधर अभियोग्यता चाचणी गुण असणे आवश्यक आहे. GATE स्कोअर मिळाल्यानंतर, उमेदवार कोल इंडियाच्या www.coalindia.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकणार आहे.
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीच्या एकूण 640 पदांसाठी 29 ऑक्टोबरपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. खाणकामाच्या सर्वाधिक 263 पदांव्यतिरिक्त, मेकॅनिकलच्या 104, इलेक्ट्रिकलच्या 102, सिव्हिलच्या 91, सिस्टीमच्या 41 आणि E&Tच्या 39 पदांचा यात समावेश आहे.
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या तरुणांनी वयोमर्यादाही लक्षात ठेवावी. सामान्य आणि EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी, 30 सप्टेंबर 2024 रोजी कमाल वयोमर्यादा 30 वर्षांपेक्षा जास्त नसावी. ओबीसी उमेदवारांसाठी वयात ३ वर्षे आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील अर्जदारांसाठी ५ वर्षांची सूट असेल.
अधिसूचनेनुसार, अर्जदाराने संबंधित क्षेत्रातील BE/B.Tech किंवा बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग पदवी किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एससी, एसटी आणि अपंग उमेदवारांसाठी किमान पात्रता ५५ टक्के ठेवण्यात आली आहे. GATE स्कोअर आवश्यक असेल. तसेच, कोणत्याही परिस्थितीत टाय झाल्यास कोल इंडिया लिमिटेड गुणवत्ता यादी अंतिम करण्यासाठी टाय ब्रेकिंग फॉर्म्युला वापरेल.
कोल इंडिया लिमिटेडच्या व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी भरतीसाठी अर्ज करताना, सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 1 हजार 180 रुपये जमा करावे लागतील. तर एससी, एसटी आणि कोल इंडिया लिमिटेड आणि त्याच्या सहाय्यक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.