सीईटी परीक्षा एप्रिल व मे महिन्यात होणार; दोन परीक्षा घेण्याचा निर्णय 

पहिली परीक्षा एप्रिल २०२५ मध्ये आणि दुसरी परीक्षा मे २०२५ मध्ये आयोजित करण्यात येईल. विद्यार्थ्यांना पहिली परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी परीक्षा देणे हे ऐच्छिक असेल.

सीईटी परीक्षा एप्रिल व मे महिन्यात होणार; दोन परीक्षा घेण्याचा निर्णय 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील(Minister of Higher and Technical Education Chandrakant Patil)यांच्या अध्यक्षतेखाली सीईटी परीक्षेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यात राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून(State Common Entrance Examination Cell) पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी-CET) वर्षातून दोन वेळा (Set twice a year) घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

पहिली परीक्षा एप्रिल २०२५ मध्ये आणि दुसरी परीक्षा मे २०२५ मध्ये आयोजित करण्यात येईल. विद्यार्थ्यांना पहिली परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी परीक्षा देणे हे ऐच्छिक असेल. दोन्ही परीक्षा दिल्यास, विद्यार्थ्याच्या ज्या परीक्षेत जास्त गुण मिळाले आहेत.त्या परीक्षेतील गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाती.

या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ आदी अधिकारी उपस्थित होते.