NTRO कडून  विविध वैज्ञानिक बी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू 

पदवी  आणि पदव्युत्तर  उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येईल. इच्छुक उमेदवार  8 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवाराला अधिकृत वेबसाइट ntro.gov.in वर जाऊन अर्ज करावा लागेल.

NTRO कडून  विविध वैज्ञानिक बी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (National Technical Research Organization) NTRO मध्ये विविध वैज्ञानिक बी पदांसाठी भरती प्रक्रिया (Recruitment Process for Scientist B Posts) सुरू केली आहे.  पदवी आणि पदव्युत्तर उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवार (candidates) 8 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. (Last date to apply is 8 November) उमेदवाराला अधिकृत वेबसाइट ntro.gov.in वर जाऊन अर्ज करावा लागेल.
मॅट्रिक्स लेव्हल-10 मधील वेतनश्रेणीसाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी. अधिक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचनेची मदत घेऊ शकतात. अधिसूचनेनुसार उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना recruit-ndl.nielit.gov.in वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि वैध ई-मेल आयडी आणि सक्रिय मोबाइल नंबरसह नोंदणी करावी लागेल. या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. दोन्ही टप्प्यातील कामगिरीच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.