‘सीबीएसई’च्या शाळांची नावे बदलणार

सीबीएसई लवकरच आपल्या 'सरस' पोर्टलद्वारे शाळांकडून ऑनलाइन अर्ज मागवणार आहे. यासाठी पोर्टलवर एक लिंक उघडली जाईल जिथे शाळा शाळेच्या नावातील बदलाअंतर्गत अर्ज करू शकतील. सीबीएसईने यासंदर्भात शाळांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

‘सीबीएसई’च्या शाळांची नावे बदलणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (Central Board of Secondary Education) संलग्न सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांना (Government and Government Aided Schools) आता त्यांच्या नावापुढे  'PMShri' अपडेट करावे लागेल ('PMShri' has to be updated before their name) यासाठी सीबीएसई लवकरच आपल्या 'सरस' पोर्टलद्वारे (SARAS Portal) शाळांकडून ऑनलाइन अर्ज मागवणार आहे. यासाठी पोर्टलवर एक लिंक उघडली जाईल जिथे शाळा शाळेच्या नावातील बदलाअंतर्गत अर्ज करू शकतील. सीबीएसईने यासंदर्भात शाळांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

CBSE बोर्डाने परिपत्रकाद्वारे माहिती दिली की, 'त्यांना या योजनेअंतर्गत निवडलेल्या शाळांकडून त्यांची नावे अद्ययावत करण्यासाठी विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. परिपत्रकानुसार, सर्व पात्र शाळा, शाळा प्रशासन आणि नियामक प्राधिकरण प्रणाली (SARAS), https://saras.cbse.gov.in/SARAS या अधिकृत वेबसाइटद्वारे 'शाळेच्या नावात बदल' श्रेणी अंतर्गत त्यांचे अर्ज सादर करू शकतात.

CBSE नुसार,  केंद्र सरकारच्या पीएम स्कूल फॉर रायझिंग इंडिया योजनेंतर्गत निवडीच्या आधारावर शाळांकडून त्यांच्या संबंधित शाळांची नावे अद्ययावत करण्याच्या विनंत्या बोर्डाला वेळोवेळी प्राप्त होत आहेत. बोर्डाचे सरस पोर्टल सत्र 2025-26 साठी बंद आहे. ते उघडल्यावर, शाळांना नावापुढे 'PMShri' जोडण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल.