UPSC CDS अंतिम निकाल जाहीर!

यूपीएससीने जाहीर केलेल्या अंतिम गुणवत्ता यादीत एकूण ५९० उमेदवारांनी स्थान मिळवले आहे. यापैकी 470 पुरुष उमेदवार आणि 120 महिला उमेदवार आहेत, जे 121 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्स (पुरुष) आणि 35 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन महिला (नॉनटेक्निकल) कोर्ससाठी बसतील. हा अभ्यासक्रम एप्रिल २०२५ मध्ये सुरू होईल.

UPSC CDS अंतिम निकाल जाहीर!

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission) UPSC संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (Combined Defence Services) CDS 2024 साठी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे. (The final merit list has been published) ही यादी https://upsc.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार पोर्टलला भेट देऊन ते तपासू शकतात. 

यूपीएससीने जाहीर केलेल्या अंतिम गुणवत्ता यादीत एकूण ५९० उमेदवारांनी स्थान मिळवले आहे. यापैकी 470 पुरुष उमेदवार आणि 120 महिला उमेदवार आहेत, जे 121 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्स (पुरुष) आणि 35 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन महिला (नॉनटेक्निकल) कोर्ससाठी बसतील. हा अभ्यासक्रम एप्रिल २०२५ मध्ये सुरू होईल. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या माहितीत, गुणवत्ता यादी तयार करताना उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीचा निकाल विचारात घेण्यात आलेला नाही.  

आयोगाने म्हटले आहे की, “सर्व उमेदवारांची उमेदवारी सध्या तात्पुरती आहे. तसेच, या उमेदवारांची जन्मतारीख आणि शैक्षणिक पात्रता यांची पडताळणी लष्कराच्या मुख्यालयात केली जाईल. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की, वेबसाइटवर उपलब्ध असलेले हे निकाल निर्धारित तारखेच्या आतच तपासले जाऊ शकतात. यानंतर, पोर्टलवरून लिंक काढून टाकली जाईल.' 

UPSC CDS 1 अंतिम निकाल पाहण्यासाठी, सर्व उमेदवारांना प्रथम https://upsc.gov.in/  या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. आता मुख्यपृष्ठावर, 'what is new' विभागात जा आणि "अंतिम निकालावर क्लिक करा,  सीडीएस (आय), 2024 (ओटीए) वर क्लिक करा. आता, पात्र उमेदवारांची नावे असलेली पीडीएफ दिसेल. पुढील विंडोमध्ये पीडीएफवर तुमचा रोल नंबर आणि नाव तपासा. PDF डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट ठेवा.