नाशिक शिक्षक मतदार संघात मोठा ट्विस्ट ; डाॅ.राजेंद्र विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सोमवरी ३ जून रोजी प्रवरा एज्युकेशन ट्रस्टचे प्रमुख आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डाॅ. राजेंद्र विखे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

नाशिक शिक्षक मतदार संघात मोठा ट्विस्ट ; डाॅ.राजेंद्र विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

एज्युवार्ता न्यूज नेट

निवडणुक आयोगाने होवू घातलेल्या विधान परिषदेच्या (Legislative Council Elections) नाशिक शिक्षक मतदार संघाच्या (Nashik Teachers Constituency) निवडणुकीत मोठा ट्विस्ट येताना दिसत आहे. मतदार संघात अनेक दिग्गज मैदानात उतरले असताना सोमवरी ३ जून रोजी प्रवरा एज्युकेशन ट्रस्टचे प्रमुख आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डाॅ. राजेंद्र विखे पाटील (Dr. Rajendra Vikhe Patil) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल (Filing of candidature application) केला आहे. त्यामुळे आता ही निवडणुक आणखीनच रंगदार होणार आहे. 

डॉ. राजेद्र विखे पाटील यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज भरला यावेळी त्यांच्यासोबत डॉ. प्रदीप पवार, डॉ. ऐस.आर.पाटील, राजेश खटोड, ऍड. अनंत फडणीस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य, अशोक सावंत, शिवाजीराव जोंधळे, प्रदीप दिघे, प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि शेकडो समर्थक उपस्थित होते. विखे पाटील यांच्या उमेदवारीने या मतदार संघात प्रचाराला अधिकची धार येण्याची शक्यता आहे. 

राजकीय प्रतिस्पर्धी असलेले संजीवनी शिक्षण संस्थेचे प्रमुख विवेक कोल्हे यांनी दोन दिवसांपुर्वी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात आता डाॅ. राजेंद्र विखे पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्याने भाजपच्या दोन नेत्यांमध्येच पुन्हा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यात विखे Vs कोल्हे हा राजकीय संघर्ष बहुचर्चित आहे. या मतदार संघात शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे जाहीर केले आहे. संदीप गुळवे हे देखील उमेदवारी दाखल करण्याची शक्यता आहे. तर विद्यामान आमदार किशोर दराडे यांनीही निवडणुक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.