परदेशी शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांची अमेरिका पहिली पसंती 

ओपन डोअर्स रिपोर्ट (ODR) नुसार, शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये भारतातून युनायटेड स्टेट्समध्ये प्रवास करणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या ३५ टक्क्यांनी वाढून २, ६८, ९२३ इतकी झाली आहे.  

परदेशी शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांची अमेरिका पहिली पसंती 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांसाठी युनायटेड स्टेट्स ही पहिली पसंती असल्याचे ओपन डोअर्सच्या अहवालातून समोर आले आहे. ओपन डोअर्स रिपोर्ट (ODR) नुसार, शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये भारतातून युनायटेड स्टेट्समध्ये प्रवास करणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या ३५ टक्क्यांनी वाढून २, ६८, ९२३ इतकी झाली आहे.  

हेही वाचा : देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू होणार स्वदेशी खेळांचा 'फिट इंडिया' सप्ताह

ओपन डोअर्स रिपोर्ट हा युनायटेड स्टेट्समधील परदेशी विद्यार्थी आणि विद्वान आणि क्रेडिट-बेअरिंग कोर्समध्ये परदेशात शिकत असलेल्या अमेरिकन विद्यार्थ्यांवर आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेने (IIE) तयार केलेला निश्चित वार्षिक अहवाल व एक सर्वेक्षण आहे. युनायटेड स्टेट्समधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी लोकसंख्येच्या वाढीचा दर प्रसिद्ध  करण्याव्यतिरिक्त, आर्थिक मदतीचे स्रोत, अभ्यासाचे क्षेत्र, यजमान संस्था आणि शैक्षणिक स्तरावरील डेटा देखील प्रसिध्द केला जातो.

यूएस विद्यापीठांमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येत गेल्या वर्षी वाढ झाली आणि कोरोना काळातील  मंदीनंतर  भारतातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ३५ टक्यांनी वाढ झाली, जो आतापर्यंतचा उचांक आहे, असे अहवालातून  दिसून आले.  अभ्यासात असे आढळून आले की सलग दुसऱ्या वर्षी, यूएस ग्रॅज्युएट प्रोग्राम हे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी मुख्य आकर्षण होते. पदवीपूर्व नोंदणीत  २१% वाढली, तर पदवीधरांची संख्या १% वाढली. तर  याआधी पदवीधर विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती, असे या अहवालातून स्पष्ट झाले.