बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षांच्या प्रवेशासाठी CUET UG परीक्षा द्यावी लागणार ; UGC चे सर्व राज्य शिक्षण मंडळांना पत्र 

पदवी अभ्यासक्रमात आपल्याला हव्या असलेल्या शाखेत आणि महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आता विद्यार्थ्यांना फक्त 12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या  गुणांवर विसंबून राहता येणार नाही.

बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षांच्या प्रवेशासाठी  CUET UG परीक्षा द्यावी लागणार  ; UGC चे सर्व राज्य शिक्षण मंडळांना पत्र 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पदवी अभ्यासक्रमात (Degree course) चांगल्या किंवा आपल्याला हव्या असलेल्या शाखेत आणि महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आता विद्यार्थ्यांना फक्त 12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या (12th Board Exams)  गुणांवर विसंबून राहता येणार नाही, यासाठी त्यांना कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट CUET UG देखील उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी, या आशयाचे पत्र विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सर्व राज्य शिक्षण मंडळांना (State Board of Education) पाठवले आहे. 

देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना त्यांच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना CUET UG 2024 बद्दल जागरूक करावे लागेल.  देशभरातील विद्यापीठे CUET UG मेरिटच्या आधारे पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश देत आहेत. म्हणून, विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसह पदवीपूर्व प्रवेशासाठी CUET UG 2024 चा ऑनलाइन अर्ज भरावा लागेल.

हेही वाचा : मोठी बातमी : NEP नियमावलीत बदल; विद्यार्थ्यांना दिलासा, प्राध्यापकांची नोकरी वाचली,मेजर विषय दुसऱ्या वर्षांपासून

पदवीपूर्व प्रवेशाचे नियम विद्यार्थी आणि पालकांनी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्व राज्य शिक्षण मंडळांनी CUET UG ची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना द्यावी. कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेशी संबंधित काही प्रश्न असल्यास ते एनटीएशी संपर्क साधू शकतात.

CUET UG 2024 साठी उमेदवार 31 मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात, असे पत्र UGC चे  सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांच्या वतीने राज्य शिक्षण मंडळांना पाठवण्यात आले आहे.