शिक्षण आणि नोकरीत ७५ टक्के आरक्षण लागू; बिहार सरकारने काढली अधिसूचना

बिहार सरकारने नुकतीच जातनिहाय जनगणना केली होती. त्यानंतर आरक्षणाची मर्यादा १५ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आरक्षण सुधारणा विधेयक २०२३ सादर करण्यात आले होते.

शिक्षण आणि नोकरीत ७५ टक्के आरक्षण लागू; बिहार सरकारने काढली अधिसूचना
Reservation

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मागील अनेक दिवसांपासून बिहारमधील आरक्षणाचा (Reservation) मुद्दा चर्चेत आहे. त्यानुसार राज्यात शिक्षण (Education) व नोकरीत ७५ टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यानुसार प्रवर्गनिहाय आरक्षण ६५ टक्के तर खुल्या गटातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण असेल. बिहारमधील (Bihar) नीतिश कुमार (Nitish Kumar) सरकारने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे आता अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), आणि ओबोसींना (OBC) ७५ टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

 

बिहार सरकारने नुकतीच जातनिहाय जनगणना केली होती. त्यानंतर आरक्षणाची मर्यादा १५ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आरक्षण सुधारणा विधेयक २०२३ सादर करण्यात आले होते. दोन्ही सभागृहांमध्ये दहा दिवसांपूर्वीच या विधेयकाला मंजुरी मिळाली होती. त्यामध्ये आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याची तरतुद आहे. या विधेयकाला विरोधी पक्ष असलेल्या भाजपनेही पाठिंबा दिला होता. त्यानंतर राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनीही शुक्रवारीच या विधेयकावर सही केली.

पालकांच्या वाढत्या अपेक्षाच विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

 

राज्यपालांच्या सहीनंतर बिहार सरकारने तातडीने अधिसूचना जारी करत नोकरी व शिक्षणात ७५ टक्के आरक्षण लागू केले. नीतिश कुमार यांनी सात नोव्हेंबर रोजी ७५ आरक्षणाची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसांतच हे आरक्षण लागूही करण्यात आले आहे. त्याला भाजपनेही पाठिंबा दिल्याने आता देशभरात आरक्षणाचा मुद्दा आणकी गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

दरम्यान, बिहारमधील वाढलेल्या आरक्षणाच्या तरतुदीनुसार अनुसूचित जातीला २० टक्के, अनुसूचित जमातील दोन टक्के, अति मागास प्रवर्गाला २५ टक्के, मागासवर्गाला १८ टक्के आरक्षण मिळेल. यापूर्वी बिहारमध्ये ५० आरक्षण होते.  त्याचप्रमाणे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मिळणारे १० टक्के आरक्षणाची तरतूद कायम राहणार आहे.  

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO