TET परीक्षेत किती गुण मिळाले; निकाल पडताळून पाहणे झाले शक्य; अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध

राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर अंतिम उत्तरसूची उपलब्ध असून परीक्षेचा निकाल यथावकाश प्रसिद्ध केला जाणार असल्याचे परीक्षा परिषदेच्या आयुक्त डॉ.अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. 

TET परीक्षेत किती गुण मिळाले; निकाल पडताळून पाहणे झाले शक्य; अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेची अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर अंतिम उत्तरसूची उपलब्ध असून परीक्षेचा निकाल यथावकाश प्रसिद्ध केला जाणार असल्याचे परीक्षा परिषदेच्या आयुक्त डॉ.अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. 

राज्य परीक्षा परिषदेतर्फे नोव्हेंबर 2025 मध्ये टीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेची अंतिरिम उत्तर सूची १९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच त्यावरील आक्षेप 27 डिसेंबरपर्यंत मागविण्यात आले होते. प्राप्त आक्षेपावर विषयतज्ज्ञ यांच्याकडून अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची तयार करण्यात आली आहे. अंतिम उत्तर सूची बाबत कोणतेही निवेदन अथवा आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत.

अंतिम उत्तर सूची पाहण्यासाठी या लिंक ला क्लिक करा : https://mahatet.in/Notices/AnswerKey/ShowFinalAnswerKey 

 सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक केली होती. त्यामुळे यंदा परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली होती. अनेक उमेदवार टीईटी परीक्षेची उत्तरसूची केव्हा जाहीर होणार याची वाट पाहत होते. त्यानुसार आता टीईटी परीक्षेची अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार उमेदवारांना आपल्याला किती गुण मिळाले हे पडताळून पाहणे शक्य होणार आहे.