TET परीक्षेतील प्रश्न केले रद्द; उत्तीर्णतेच्या गुणांमध्ये होणार बदल

प्रामुख्याने पेपर क्रमांक दोन मधील गणित- विज्ञान या वैकल्पिक विषय मराठी माध्यमाचे चार प्रश्न तर कन्नड माध्यमाचे 12 प्रश्न रद्द झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या विषयाचे उत्तीर्णतेचे प्रमाण बदलणार आहे.

TET परीक्षेतील प्रश्न केले रद्द; उत्तीर्णतेच्या गुणांमध्ये होणार बदल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET परीक्षेची अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध झाले आहे. मात्र काही प्रश्नांमध्ये प्रिंटिंग मिस्टेक झाल्यामुळे परीक्षा परिषदेतर्फे हे प्रश्न रद्द (questions cancelled)करण्यात आले आहेत. प्रामुख्याने पेपर क्रमांक दोन मधील गणित- विज्ञान या वैकल्पिक विषय मराठी माध्यमाचे चार प्रश्न तर कन्नड माध्यमाचे 12 प्रश्न रद्द झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या विषयाचे उत्तीर्णतेचे प्रमाण बदलणार आहे.

मोठी बातमी: TET परीक्षेच्या निकालात सुमारे १० टक्क्यांपर्यंत वाढ; निकाल ऑनलाइन उपलब्ध

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे नुकतीच टीईटी परीक्षेचे अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात आली. या उत्तर सूची नंतर आता उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे आक्षेप नोंदवता येणार नाहीत. उमेदवार अंतिम उत्तर सूची पहा आपल्याला किती गुण मिळाले हे तपासून पाहू शकतात. त्यामुळे आपण पास झालो किंवा नाही, हे संबंधित उमेदवारांना समजणार आहे. मात्र, प्रिंटिंग मिस्टेकमुळे काही प्रश्न रद्द केले आहेत. परीक्षा परिषदेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या उत्तर सूचितील काही # असे चिन्ह असलेले प्रश्न रद्द करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने इयत्ता सहावी ते आठवीच्या शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या पेपर क्रमांक दोन मधील गणित- विज्ञान या वैकल्पिक विषयासह सामाजिक शास्त्र या विषयातील प्रश्न रद्द झाले आहेत. 
हेही वाचा : TET परीक्षेत किती गुण मिळाले; निकाल पडताळून पाहणे झाले शक्य; अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध

इयत्ता सहावी ते आठवीच्या शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या पेपर क्रमांक दोन मधील मराठी माध्यमाच्या व इंग्रजी माध्यमाच्या गणित विज्ञान या विषयाच्या परीक्षेतील प्रश्न क्रमांक 95,102, 111 व 119 हे रद्द करण्यात आले आहेत. हे प्रश्न अनुक्रमे सी, बी, ए आणि डी अशा संचकोड मधील आहेत.
उर्दू माध्यमाच्या गणित व विज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील एकूण आठ प्रश्न रद्द झाले आहेत. प्रश्न क्रमांक 10, 21, 26, 95, 102, 111 आणि 119 या प्रश्नांचा त्यात समावेश आहे. उर्दू माध्यमाच्या सामाजिक शास्त्र या विषयाचे 121, 126, 131, 146 हे चार प्रश्न रद्द झाले आहेत. 

रद्द झालेल्या प्रश्नांमध्ये सर्वाधिक प्रश्न हे कन्नड माध्यमाच्या गणित व विज्ञान या प्रश्नपत्रिकेतील आहेत. गणित व विज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 5(A) 15 (D), 20 (C),20(D), 25(B), 25(C), 30(A), 30(B),95 (C), 102(B), 111 (A), 119 (D), या प्रश्नांचा समावेश आहे. 
त्याचप्रमाणे तेलगू माध्यमातून गणित विज्ञान या विषयाचे प्रश्न क्रमांक एक सहा 11, 16, 95, 102, 111 ,119 हे प्रश्न रद्द केले आहेत.