भारतीय तटरक्षक दलात GD आणि DB पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू!
या भरतीमध्ये एकूण ३०० पदे भरली जातील. यापैकी २६० पदे सेलर जनरल ड्यूटी (जीडी) साठी आहेत आणि ४० पदे सेलर डोमेस्टिक ब्रांच (डीबी) साठी आहेत. जीडी या पदासाठी, उमेदवाराची शैक्षणिक पात्रता भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर DB या पदासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard Corps) ११ फेब्रुवारी २०२५ पासून जनरल ड्यूटी (General Duty) GD आणि डोमेस्टिक ब्रांच (Domestic Branch) DB पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. (The recruitment process for the posts has started) ही भरती भारतीय तटरक्षक दलाच्या CGEPT-02/2025 भरती अंतर्गत केली जात आहे. इच्छुक उमेदवार भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइटला joinindiancoastguard.cdac.in भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२५ आहे.
या भरतीमध्ये एकूण ३०० पदे भरली जातील. यापैकी २६० पदे सेलर जनरल ड्यूटी (जीडी) साठी आहेत आणि ४० पदे सेलर डोमेस्टिक ब्रांच (डीबी) साठी आहेत. भारतीय तटरक्षक दलाकडून सेलर जनरल ड्यूटी (जीडी) या पदासाठी, उमेदवाराची शैक्षणिक पात्रता भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर सेलर डोमेस्टिक ब्रांच (DB) या पदासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २२ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
या भरतीसाठी अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अनारक्षित/ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ३०० रुपये भरावे लागतील. अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे.
अशी असेल अर्ज प्रक्रिया
* सर्वप्रथम उमेदवारांना joinindiancoastguard.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल
* यानंतर, उमेदवाराला 'प्रिपेयर युअर अकाऊंट' वर क्लिक करून नोंदणी करावी लागेल.
* नोंदणी केल्यानंतर, उमेदवाराला सर्व आवश्यक माहिती भरून अर्ज सादर करा.
* पूर्णपणे भरलेल्या अर्जाची प्रिंटआउट घ्या आणि ती सुरक्षित ठेवा.