UPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; रोहित धोंडगे सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पहिला

या परीक्षेत नियुक्तीसाठी एकूण 206 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये 92, मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये 18 आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये 26 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

UPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; रोहित धोंडगे सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पहिला

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission) UPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे (Final results of Engineering Services Examination announced) रोहित धोंडगे  या विद्यार्थ्याने सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. (Rohit Dhondge has secured first rank in Civil Engineering) UPSC ने upsc.gov.i  या अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर केला आहे. उमेदवार पोर्टलवर जाऊन उमेदवारांची यादी देखील डाउनलोड करू शकतात. 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, या परीक्षेत नियुक्तीसाठी एकूण 206 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये 92, मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये 18 आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये 26 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. तसेच 70 E&T उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. शिफारस केलेल्या उमेदवारांची संख्या सामान्य श्रेणीमध्ये सर्वाधिक आहे. ही संख्या 71 आहे. त्यापाठोपाठ OBC (59), SC (34), EWS (22) आणि ST (20) आहेत. या परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

या परीक्षेत स्थापत्य अभियांत्रिकीच्या परीक्षेत रोहित धोंडगे याने अव्वल, तर हर्षित पांडे व लक्ष्मीकांत यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. डी मदनकुमार चौथ्या आणि अमन प्रताप सिंग पाचव्या स्थानावर आहेत. यूपीएससीने जूनमध्ये अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी लेखी परीक्षा घेतली होती. यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मुलाखती किंवा व्यक्तिमत्त्व चाचणी घेण्यात आली होती. आता आयोगाने अंतिम निकाल जाहीर केला आहे. 

UPSC सिव्हिल इंजिनीअरिंग परीक्षेचा अंतिम निकाल पाहण्यासाठी, सर्व उमेदवारांना प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर, होमपेजवर उपलब्ध असलेल्या ESE लिंकवर क्लिक करावे लागेल. आता तुमच्या समोर एक लिंक ओपन होईल. या PDF मध्ये उमेदवारांचे रोल नंबर असतील, ज्यामध्ये उमेदवार त्यांचे रोल नंबर तपासू शकतात.