CSEET जुलै परीक्षेचा निकाल जाहीर 

निकाल ICSI च्या अधिकृत वेबसाईट icsi.edu वर ऑनलाइन जाहीर करण्यात आले आहेत.

CSEET जुलै परीक्षेचा निकाल जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (CSEET) 2024 जुलै सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ही परीक्षा 6 ते 8 जुलै 2024 दरम्यान इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज (ICSI) द्वारे घेण्यात आली होती.  निकाल ICSI च्या अधिकृत वेबसाईट icsi.edu वर ऑनलाइन जाहीर करण्यात आले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर, आता उमेदवार लॉगिन तपशील प्रविष्ट करून निकाल तपासू शकतात. 

उत्तीर्ण होण्यासाठी ५० टक्के गुण मिळणे अनिवार्य आहे.
ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना सर्व विषयांमध्ये मिळून किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. सर्व पेपर्समध्ये किमान ४०% गुण मिळणे बंधनकारक आहे. कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट (CSEET) 2024 शी संबंधित इतर तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

असे करा स्कोअर कार्ड डाउनलोड 

* CSEET च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या, icsi.edu.
* वेबसाइटच्या होम पेजवर सक्रिय लिंकवर क्लिक करा.
* नवीन पृष्ठावर, विद्यार्थ्यांचे लॉगिन क्रेडेंशियल (अर्ज क्रमांक, जन्मतारीख) तपशील भरा आणि सबमिट करा.
* आता तुम्ही तुमचा CSEET निकाल डाउनलोड आणि प्रिंट करू शकाल.