UGC NET : जून 2024 परीक्षेसाठी सिटी स्लिप उपलब्ध

ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर सिटी स्लीप उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

UGC NET : जून 2024 परीक्षेसाठी सिटी स्लिप उपलब्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) च्या जून 2024 सत्रासाठी सिटी स्लिप प्रसिद्ध केले आहे. आज म्हणजेच शुक्रवार दि. 7 जून रोजी ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर सिटी स्लीप उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नेट परीक्षा 18 जून रोजी होणार आहे.

ज्या उमेदवारांनी UGC NET जून 2024 परीक्षेसाठी स्वत:ची नोंदणी केली आहे, त्यांनी NTA द्वारे दिलेले त्यांचे परीक्षेचे शहर जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. यानंतर, होम पेजवर दिलेल्या ताज्या बातम्या विभागात सक्रिय केलेल्या ‘सिटी इंटिमेशन’च्या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर नवीन पृष्ठावर, उमेदवारांनी त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख तपशील भरून सबमिट करावा. यानंतर, उमेदवारांना त्यांची परीक्षा सिटी स्लिप स्क्रीनवर पाहता येईल आणि त्याची प्रिंटही घेता येईल.

NTA 18 जून 2024 रोजी देशभरातील विविध केंद्रांवर 83 विषयांसाठी पेन आणि पेपर पद्धतीने UCG NET परीक्षा आयोजित करेल. NTA ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, परीक्षा सिटी स्लिप डाउनलोड करताना कोणत्याही उमेदवाराला समस्या येत असल्यास,उमेदवार 011-40759000 या क्रमांकावर  संपर्क करू शकतात. किंवा ugcnet@nta.ac.in वर ईमेल करू शकतात.

ही परीक्षा दोन सत्रात घेण्यात येणार आहे. पहिले सत्र सकाळी 9.30 ते दुपारी 12.30  आणि दुसरे सत्र  दुपारी 3 ते 6  या वेळेत होणार आहे. सदर परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेत असणार आहे. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 2 गुण दिले जातील. तर या परीक्षेत मायनस मार्किंग नसेल.