विद्यापीठातील उपकुलसचिवांच्या अंतर्गत बदल्या; आता कोण कुठे गेले 

विद्यापीठाच्या कुलसचिव कार्यालयातर्फे या बदल्या करण्यात आल्या आहेत.

विद्यापीठातील उपकुलसचिवांच्या अंतर्गत बदल्या; आता कोण कुठे गेले 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागात कार्यरत असलेल्या उप कुलसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत.त्यामुळे विद्यापीठात कामानिमित्ताने येणाऱ्या विद्यार्थ्यांसह महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना नव्या व्यक्तींशी समन्वय साधावा लागणार आहे.परीक्षा विभागासह इतर प्रशासकीय विभागात या बदल्या झाल्या आहेत. विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव यांनी बदली आदेश काढला असून सर्व अधिकारी दिलेल्या पदावर रुजू झाले आहेत. 

विद्यापीठाच्या कुलसचिव कार्यालयातर्फे या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रशासन शिक्षकेतर कक्षचे  उपकुलचिव प्रदिप कोळी यांची बदली परीक्षा विभागात झाली असून त्यांच्या जागी परीक्षा विभागातील उपकुलसचिव पी.व्ही.कुलकर्णी यांची बदली झाली.तर शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव राजेश राहेरकर यांची बदली परीक्षा विभागात पुनर्रमूल्यांकन कक्ष येथे झाली आहे. तर शैक्षणिक मान्यता कक्षाचे उपकुलसचिव मुंजाजी रासवे यांच्याकडे शैक्षणिक प्रवेश विभागाची जबादारी दिली आहे. तसेच त्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता विभाग कक्षाचे अतिरिक्त काम दिले आहे. तसेच सखाराम डावखर यांच्याकडे  शैक्षणिक- शिक्षक मान्यता कक्षाचे काम दिले आहे. त्याचप्रमाणे निवडणूक आणि नियोजन व विकास विभागाच्या उपकुसचिव वैशाली साकोरे यांच्याकडे आरक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.तर आरक्षण विभागातील उप कुलसचिव वनसिंग वळवी यांना नियोजन व विकास विभागाचे कामकाज देण्यात आले आहे.

नुकतीच पदोन्नती मिळून उपकुलसचिव झालेले ज्ञानेश्वर साळुंके यांना परीक्षा विभागाची पूर्णवेळ जबाबदारी दिली असून गृहव्यवस्थापन विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तर परीक्षा विभागातील गिरीश बेत यांची शैक्षणिक संलग्नता कक्ष येथे बदली करण्यात आली आहे.त्याचाप्रमाणे सहायक कुलसचिव यांची बदली परीक्षा विभागात झाली आहे.