आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे माहिती साठ्याची गोपनीयता धोक्यात 

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मोठ्या प्रमाणावरील माहिती साठ्याचे विश्लेषण लगेच करता येत

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे माहिती साठ्याची गोपनीयता धोक्यात 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

'डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (Artificial intelligence) शिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.या नव्यातंत्रामुळे मानवी प्रतिभेला धोका नाही.मात्र,जग एकमेकांशी जोडले गेल्याने खासगीपणा उरलेला नाही.आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मोठ्या प्रमाणावरील माहिती साठ्याचे विश्लेषण लगेच करता येत असले तरी माहिती साठ्याची गोपनीयता धोक्यात आली आहे,असे मत संगणक तज्ज्ञ डॉ.दीपक शिकारपूर (Dr. deepak shikarpur)यांनी व्यक्त केले.

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट बॉट्स अँड चॅट जीपीटी'या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ.दीपक शिकारपूर बोलत होते.भारती विद्यापीठाच्या धनकवडी शैक्षणिक संकुलात झालेल्या या व्याख्यानास अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.विदुला सोहोनी,कुलसचिव जी.जयकुमार,उपप्राचार्य डॉ.सुनीता जाधव,उपप्राचार्य डॉ.सचिन चव्हाण,डॉ.कुलदीप राडे आदी उपस्थित होते.

डॉ.शिकारपूर म्हणाले,आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शैक्षणिक क्षेत्रात उपयोग करून अगदी व्यक्तिगत पातळीवरील शैक्षणिक,अध्यापनाची व्यवस्था करणे शक्य आहे. 

 डॉ.जी.जयकुमार म्हणाले,'आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरील अवलंबित्व वाढल्यास मानवी मेंदूच्या विश्लेषणावर,समस्या सोडवणुकीच्या क्षमतेवर मर्यादा येऊ शकतात.