श्री राम लल्ला प्राण प्रतिष्ठा दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; विद्यापीठाचे पेपर स्थगित

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 22 जानेवारी रोजीच्या सर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्री राम लल्ला प्राण प्रतिष्ठा दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; विद्यापीठाचे पेपर स्थगित

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) येथे होणाऱ्या श्री राम लल्ला प्राण प्रतिष्ठा दिनानिमित्त (occasion of Shri Ram Lalla Pran Pratishtha Day)केंद्र शासनाकडून सुट्टी जाहीर (Holiday announced by Central Govt) करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शाळा व महाविद्यालयांना (Schools and colleges) 22 जानेवारी रोजी सुट्टी असणार आहे. परिणामी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) 22 जानेवारी रोजीच्या सर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रभू श्रीराम यांचे अयोध्येत भव्य-दिव्य मंदिर उभारण्यात आले आहे. येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम लल्ला प्राण प्रतिष्ठा दिनानिमित्त देशभरातील नामांकित व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाने 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केले आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी असणार आहे.

हेही वाचा : वयाच्या 21व्या वर्षीच विनायकने गाजवलं एमपीएससीचं मैदान ; आधी उपशिक्षण अधिकारी , आता राज्यात प्रथम

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सध्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जात आहे. 22 जानेवारी रोजी सुद्धा काही विषयांच्या परीक्षा नियोजित होत्या. परंतु, शासनाने सुट्टी जाहीर केल्यामुळे या परीक्षा स्थगित केल्या जात असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.महेश काकडे यांनी सांगितले. तसेच विद्यापीठातर्फे या संदर्भातील अधिकृत पत्र जाहीर केले जाणार असल्याची माहितीही काकडे यांनी दिली.