NABARD गट- C कार्यालय परिचर पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

NABARD गट- C कार्यालय परिचर पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  

नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटने (NABARD) गट-C कार्यालय परिचर पदांसाठी भरती (Recruitment for Office Attendant Posts) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 108 पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार (Candidates) 2 ऑक्टोबर 2024 ते 21 ऑक्टोबर 2024 या कालावधीत https://www.nabard.org/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. 

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. या पदासाठी अर्जदारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत विशेष सवलत दिली जाईल. ही सवलत अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी लागू असेल. 

नाबार्ड कार्यालय परिचर पदांसाठी अर्ज करण्यासाठी,अर्जदारांना श्रेणीनुसार भिन्न अर्ज शुल्क भरावे लागतील. सामान्य, OBC, EWS श्रेणीतील उमेदवारांना 450 रुपये शुल्क भरावे लागेल. तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना 50 रुपये शुल्क भरावे लागेल. उमेदवार क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे अर्ज फी भरू शकतील.    

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम NABARD च्या nabard.org या अधिकृत वेबसाइटवर जावे. नंतर मुख्यपृष्ठावरील  “NABARD Office Attendant Recruitment 2024” या  लिंकवर क्लिक करा. येथे स्वतःची नोंदणी करा. तुमच्या मोबाईल नंबरवर नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड पाठवला जाईल. मिळालेला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा आणि अर्ज पूर्णपणे भरा. यानंतर, सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा. नंतर उमेदवार अर्ज फी भरा. सर्व माहिती तपासल्यानंतर, "सबमिट" वर क्लिक करा. त्यानंतर फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.