भरदिवसा मर्डर: चाकूने सपासप वार करून विद्यार्थ्याची निर्घृण हत्या
गौरव गणेश बायस्कार २४ वर्षीय तरुण सोमवारी सकाळी १०:३० मित्राच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेला असता तीन ते चार जणांनी त्याला चाकूने भोकसून पोटात आणि छातीवर डाव्या बाजूला सपासप वार करत हत्या केली आहे. दरम्यान गौरवचा यामध्ये जागीच मृत्यू झाला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील (Akola Crime News) उरळ पोलीस स्टेशन हद्दीत सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. निंबा-तेल्हारा मार्गावरील कारंजा फाट्याजवळ २० वर्षीय गौरव बायस्कार याची काही तरुणांनी चाकूने वार करीत निघृणपणे हत्या (Brutal murder of a student) केली. ही घटना काही तरुणांसोबत झालेल्या किरकोळ वादातून घडली. गौरव हा मुळचा अंदुरा (ता. बाळापूर) येथील रहिवासी असून कारंजा येथील जिजामाता महाविद्यालयात (Jijamata College Karanja) बारावीच्या पुढचं शिक्षण घेत होता. शिक्षणासाठी तो कारंजा येथे वास्तव्यास होता. १ डिसेंबरला सकाळी काही मित्रांसोबत फाट्याजवळ असताना अचानक वाद चिघळला आणि संतापलेल्या तरुणांनी त्याच्यावर अमानुष हल्ला केला. या मारहाणीत गौरव जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव गणेश बायस्कार २४ वर्षीय तरुण सोमवारी सकाळी १०:३० मित्राच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेला असता तीन ते चार जणांनी त्याला चाकूने भोकसून पोटात आणि छातीवर डाव्या बाजूला सपासप वार करत हत्या केली आहे. दरम्यान, गौरवचा यामध्ये जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एक फरार आहे. सध्या मृतदेहावर शवविच्छेदन अकोला शासकीय रुग्णालय येथे सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच उरळ पोलीस स्टेशनचे निरीक्षक पंकज कांबळे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनेच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे. आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते; मात्र लोहारा येथील दोन युवकांनी हत्येत सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी प्रकरण गंभीर असल्याचे सांगत तातडीने आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यांच्या सूचनेनुसार विशेष पथक तयार करण्यात आले. उरळ पोलिसांनी तत्काळ हालचाल करून दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. आणखी कोण सहभागी आहे का, याचा तपासही वेगाने केला जात आहे.
eduvarta@gmail.com