SPPU NEWS : विद्यापीठात विद्यार्थ्यांना आंबट चपात्यांचे जेवण; विद्यार्थ्यांचा मेस चालकाला जाब.. 

चपात्या आंबट लागत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी जेवण अर्धवट सोडले आहे. 

SPPU NEWS :  विद्यापीठात विद्यार्थ्यांना आंबट चपात्यांचे जेवण; विद्यार्थ्यांचा मेस चालकाला जाब.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मुंबई विद्यापीठांमधील (Mumbai University) ४० विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची घटना ताजी असताना  सोमवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) रिफेक्ट्रीमध्ये विद्यार्थ्यांना खराब पिठाच्या चपात्या (Bad flour chapatis) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर मेसमध्ये जेवण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवाज उठवत मेस मालकाला जाब विचारला. चपात्या आंबट लागत असल्याचा आरोप (Allegation that chapatya is sour) करत विद्यार्थ्यांनी जेवण अर्धवट सोडले आहे. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने मेस चालकाला पाच हजार रुपये दंड केला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मेस मध्ये अळी सापडण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.त्यामुळे विद्यापीठाने रिफेक्ट्री चालकाचे कंत्राट रद्द करून त्याला विद्यापीठातून हद्द पार केले.मात्र, रिफेक्ट्रीचे कंत्राट लोकसभा निवडणूकीच्या आचार संहितेत अडकून पडले आहे.त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांची तात्पूर्ती सोय म्हणून विद्यापीठातीलच एका मेस चालकाकडे रिफेक्ट्रीची जबाबदारी दिली आहे.मात्र, रिफेक्ट्रीच्या जेवणाच्या दर्जात अजूनही सुधारणा झाली नाही.सोमवारी विद्यार्थ्यांनी चपात्या खराब असल्याने जेवण अर्धवट सोडले.त्यात मेस चालकांच्या एका कर्मचाऱ्याबरोबर विद्यार्थ्यांची शाब्दिक बाचाबाची झाली.

हेही वाचा : UGC अध्यक्षांची नवी घोषणा : ७५ टक्के गुण मिळवणाऱ्या पदवी धारकांना थेट पीएच.डी.ला प्रवेश

चपाती आणि भाजीसह सर्व आंबट लागत आहे. चपात्यांचे पिठ काल मळलेले असावे, असा अंदाज विद्यार्थ्यांकडून वर्तवण्यात आला आहे. भाजीचा दर्जा चांगला नाही. मेस कर्मचाऱ्यांनी डोक्याला कॅप घेतलेली नाही. हातात मोजे घातले नाही. स्वच्छतेचे नियम पाळले जात नाही, याकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले.

विद्यार्थ्यांना  अन्न आंबट लागले तेव्हा सर्वांनी जेवण अर्धवत सोडून फेकून दिले. याचे व्हिडिओ विद्यार्थ्यांकडून काढून विद्यापीठ प्रशासनाला दाखवण्यात आले आहे. सध्या हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होट आहे. मुंबई विद्यापीठात घडलेला विषबाधेचा प्रकार  इथे घडू नये,अशी चिंता देखील विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. 

-------------------------------

जेवण घराब लागत असल्याबाबत सोमवारी विद्यार्थ्यांनी तक्रार केली.त्यावर प्रत्यक्ष रिफेक्ट्री भेट देऊन पहाणी केली.मेस चालकाला जेवणात सुधारणा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.चपात्या खराब असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती.त्यामुळे मेस चालकाकडून पाच हजार रुपये दंड वसूल करण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनातर्फे देण्यात आल्या.
- राजेंद्र घोडे, अध्यक्ष ,भोजन गृह समिती,  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

---------------

विद्यापीठातील मेसच्या गुणवत्तेत सुधारणा होत  नाही. सोमवारी चपाट्या आंबट लागल्याने विद्यार्थी जेवण अर्धवट सोडून निघून गेले. मेस चालक बदलून चालणार नाही तर त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे.खराब अन्न  देणाऱ्या मेसा चालकाला दर वेळी पाच ते दहा हजार रुपये दंड ठोठावल्या शिवाय त्यात सुधारणा होणार नाही.

- राहुल ससाणे,  विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती