गृहमंत्र्यांच्या नागपूरात सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लाॅजवर नेऊन लैंगिक अत्याचार..
अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जात असताना दोन नराधमांनी तिचे अपहरण करून तिला जवळच्या भिलगाव परिसरातील लाॅजवर नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार करून तिचे लैंगिक शोषन केले यामुळे संपूर्ण परिसरात संतापजनक वातावरण आहे. हा सर्व प्रकार शहरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जिल्ह्यातील संतपाजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुन्हेगारांवरील कायद्याचा धाक संपला की काय? असा प्रश्न सर्वसामान्यातून उमटत आहे. नागपूरात (Nagpur Crime News) इयत्ता सहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका १२ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण (Kidnapping of a 12-year-old minor student) करून तिचे लैंगिक शोषन (sexual abuse) केल्याचे समोर आले आहे.
आता क्रीडा शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे क्रीडामंत्र्यांचे आश्वासन
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जात असताना दोन नराधमांनी तिचे अपहरण करून तिला जवळच्या भिलगाव परिसरातील लाॅजवर नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार करून तिचे लैंगिक शोषन केले यामुळे संपूर्ण परिसरात संतापजनक वातावरण आहे. हा सर्व प्रकार शहरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे.
दरम्यान, यातील आरोपींनी अत्याचार करतानाचे व्हिडीओ काढले. सोबतच कुणाला सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल आणि जीवे मारण्याची धमकी ही दिली, याप्रकरणाची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी करण आणि रोहीत या दोन आरोपींना अटक केली. दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असून दोघांवर यापूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुरूवारी ही अत्याचाराची धक्कादायक घटना घडली असून शुक्रवारी सायंकाळी पिडीतेच्या आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलीसांनी आरोपी विरुद्ध बलात्कार आणि पोस्कोच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केलाय. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
eduvarta@gmail.com