विद्यापीठातील विद्यार्थ्यांची ‘खुराणा प्रोग्राम फॉर स्कॉलर्स’ साठी निवड

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी सुहानी शर्मा आणि आदित्य मसलेकर यांची २०२४ वर्षांच्या डॉ. हरगोविंद खुराना यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या ‘खुराणा प्रोग्राम फॉर स्कॉलर्स’ साठी निवड करण्यात आली आहे.

विद्यापीठातील  विद्यार्थ्यांची  ‘खुराणा प्रोग्राम फॉर स्कॉलर्स’ साठी निवड

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University)बायोइन्फॉरमॅटिक्स आणि बायोटेक्नॉलजी विभागातील सुहानी शर्मा आणि आदित्य मसलेकर (Student Suhani Sharma and Aditya Maslekar) यांची २०२४ वर्षांच्या डॉ. हरगोविंद खुराना यांच्या स्मरणार्थ (In memory of Dr.Hargobind Khurana) देण्यात येणाऱ्या ‘खुराणा प्रोग्राम फॉर स्कॉलर्स’ (Khurana Program for Scholars)या स्कॉलरशिपसाठी निवड करण्यात आली आहे.  यांतर्गत सुहानी आणि आदित्य  यांना अमेरिकेतील अग्रगण्य विद्यापीठांमध्ये संशोधन करता येणार आहे. 

विद्यापीठातील बायोटेक्नॉलजी विभाग, भारत सरकार आणि इंडो-यूएस सायन्स अँड टेक्नॉलजी फोरम (IUSSTF) यांच्या संयुक्त विद्यामाने भारतीय वंशाचे नोबेल पुरस्कार प्राप्त  प्रसिद्ध जैव-रसायनशास्त्रज्ञ डॉ. हरगोविंद खुराना यांच्या स्मरणार्थ दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येते. विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेता यावं, त्यांच्या शोधनासाठी मदत करण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते.  

सुहानी शर्मा आणि आदित्य मसलेकर हे दोघही विद्यापीठातील बायोइन्फॉरमॅटिक्स आणि बायोटेक्नॉलजी विभागाचे विद्यार्थी असून आदित्य मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल - कॅन्सर सेंटर, हार्वर्ड मेडिकल स्कूल येथे रक्ताभिसरण ट्यूमर सेल (सीटीसी) यावर संशोधन करणार आहे. तर सुहानी अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संस्था (NIH), राष्ट्रीय ऍलर्जी आणि संसर्गजन्य रोग संस्था (NIAID) येथे संशोधन करणार आहे. राष्ट्रीय स्तरावर या शिष्यवृत्तीसाठी ७५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून याअतर्गत संशोधनाचा कालावधी तीन महिन्यांचा असणार आहे.