Law Admission : तीन वर्षे LLB प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

एलएलबी अभ्यासक्रमांसा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 11 जुलैपासून प्रवेशासाठी नोंदणी करता येणार असून प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी २९ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Law Admission : तीन वर्षे LLB प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

Three Years Law: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (State Common Entrance Test Cell) पाच वर्षे लॉ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर आता तीन वर्षे लॉ (three years llb ) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक (admission process schedule)जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना 11 जुलैपासून प्रवेशासाठी नोंदणी करता येणार असून प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी २९ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

सीईटी सेलच्या माध्यमातून व्यवसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार तीन वर्षे लॉ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासून सुरू केली जाणार आहे. विद्यार्थी या https://llb3cap24.mahacet.org/Public/Notifications.aspx?NotificationCategoryID=4 संकेतस्थळाला भेट देवून प्रवेशाचे वेळापत्रक पाहू शकतात. विद्यार्थ्यांना 11 जुलै ते 18 जुलै या कालावधीत प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी अपलोड केलेल्या कागदपत्रांची तपासणी 11 जुलै ते 21 जुलै या कालावधीत करण्यात येणार आहे. सीईटी सेल तर्फे येत्या 23 जुलै रोजी प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थी 23 ते 26 या कालावधीत अर्जामध्ये दुरुस्ती करू शकतात. प्रवेशाची पहिली अंतिम गुणवत्ता यादी येत्या 29 जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे, सीईटी सेंलतर्फे परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे.