JEE ॲडव्हान्स  2024 नोंदणी 27 एप्रिलपासून

या वर्षी प्रवेशासाठी IIT मद्रासतर्फे घेण्यात येणाऱ्या JEE Advanced  2024 ची नोंदणी प्रक्रिया येत्या शनिवार (दि. 27) पासून सुरू होणार आहे.

JEE ॲडव्हान्स  2024 नोंदणी 27 एप्रिलपासून

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आयआयटीमध्ये  प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर येत आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs) मध्ये देशभरातील पदवी अभ्यासक्रमांमध्ये या वर्षी प्रवेशासाठी IIT मद्रासतर्फे (IIT Madras) घेण्यात येणाऱ्या JEE Advanced  2024 ची नोंदणी प्रक्रिया येत्या शनिवार (दि. 27) पासून सुरू होणार आहे.

IIT मद्रासने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, जेईई मेन 2024 पात्र झालेले विद्यार्थी 7 मे रोजी निश्चित केलेल्या अंतिम तारखेपर्यंत अधिकृत वेबसाइट jeeadv.nic.in वर स्वतःची नोंदणी करू शकतील. या प्रवेश परीक्षेत बसण्यासाठी, विद्यार्थ्यांनी JEE Main 2024 च्या पेपर 1 (BE/B.Tech) मध्ये 2,50,000 ची कमाल रँक प्राप्त केलेली असावी. ही संख्या सर्व श्रेणी (GEN EWS, OBC NCL, SC, ST, PWD, इ.) एकत्र करून निर्धारित केली गेली आहे.

 JEE Advanced 2024 परीक्षेसाठी नोंदणी करताना IIT मद्रासने निश्चित केलेले शुल्क त्यांना ऑनलाइन माध्यमातून भरावे लागेल. सर्व श्रेणीतील महिला उमेदवार आणि SC/ST/PWD उमेदवारांसाठी नोंदणी शुल्क 1हजार 600 रुपये आहे. इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी 3 हजार 200 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. 10 मे 2024 पर्यंत विद्यार्थी नोंदणी शुल्क जमा करू शकतील.