माफ करा म्हणत 'बीएलओ' शिक्षकाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये सांगितलं कारण
SIR ची प्रक्रिया राबवण्यास सुरूवात केली आहे. ही पुनर्पडताळणी प्रक्रियेद्वारे सध्या देशातील 12 राज्यांमध्ये काम सुरू आहे. या प्रक्रियेचे काम हे त्या त्या राज्यातील शिक्षकांना देण्यात आले आहे. ज्यामुळे अनेक शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा भार पडलेला आहे. पण हा कामाचा ताण आता अनेक शिक्षकांच्या जीवावर उठू लागला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्रीय निडणूक आयोगाने (Central Election Commission) मतदारयाद्यांची पुनर्पडताळणी (Re-verification of electoral rolls) म्हणजेच SIR ची प्रक्रिया राबवण्यास सुरूवात केली आहे. ही पुनर्पडताळणी प्रक्रियेद्वारे सध्या देशातील 12 राज्यांमध्ये काम सुरू आहे. या प्रक्रियेचे काम हे त्या त्या राज्यातील शिक्षकांना देण्यात आले आहे. ज्यामुळे अनेक शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा भार पडलेला आहे. पण हा कामाचा ताण आता अनेक शिक्षकांच्या जीवावर उठू लागला आहे. SIR चे काम पूर्ण होत नसल्यामुळे आता शिक्षकांना मानसिक तणाव (Mental stress for teachers) येऊ लागला असून ते आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू लागले आहेत. गेल्या महिन्याभरात राजस्थान, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू या राज्यातील बीएलओंनी आत्महत्या केल्याची घटना घडलेल्या असतानाच आता उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील एका बीएलओनी आत्महत्या (Teacher commits suicide by hanging) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील 46 वर्षीय सर्वेश सिंग यांनी तीन पानांची सुसाइड नोट लिहित आत्महत्या केली आहे. बीएलओ म्हणून काम पाहणारे शिक्षक सर्वेश सिंग यांना एसआयआरचे काम झेपत नसल्याने आणि ते वेळेत पूर्ण होत नसल्याने त्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. गळफास घेण्यापूर्वी सर्वेश यांनी एक व्हिडीओ सुद्धा बनवला.
हेही वाचा - मास्तराला बाईचा नाद भोवला; नातेवाईकांनी धु धु धुतला..
ज्यामध्ये ते ओक्साबोक्श रडताना दिसत असून त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी माफी मागितली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सर्वेश सिंग रडत रडत म्हणत आहेत की, मी खूप तणावात आहे. गेल्या 20 दिवसांपासून मला झोपायलाही मिळालेले नाही. मला चार लहान मुली आहेत. इतरांची कामं पूर्ण होत आहेत, पण मी माझे काम पूर्ण करु शकत नाहीये. या व्हिडीओमधून त्यांनी आपली आईला आणि बहिणीला त्यांच्या चार मुलींची काळजी घेण्याची विनंती केली आहे.
आई, कृपया माझ्या मुलींची काळजी घे. कृपया मला माफ करा. मी काम पूर्ण करू शकलो नाही. मी एक कठोर पाऊल उचलणार आहे. असे म्हणत सर्वेश यांनी त्यांच्या या निर्णयासाठी कोणालाही दोषी ठरवू नये आणि कुटुंबाला याबद्दल काहीही प्रश्न विचारू नये किंवा विचारू नये, असे आवाहन केले आहे. सर्वेश सिंग त्यांच्या कुटुंबीयांना घराच्या स्टोरेज रूममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळले. ज्यानंतर, त्यांनी ताबडतोब स्थानिक पोलिसांना कळवले. घटनास्थळी जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेली तीन पानांची सुसाइड नोट सापडली आहे. या चिठ्ठीत, सिंग यांनी निर्धारित वेळेत एसआयआरचे लक्ष्य पूर्ण करू न शकल्याचे कारण देत आत्महत्या केली आहे.
eduvarta@gmail.com