मोठा दिलासा: शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाला स्थगिती

राज्यातील शाळांतील शिक्षकांच्या समायोजनामुळे अनेक शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर आता  शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी संचमान्यता स्थगितीबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना परिपत्रकाद्वारे निर्देश दिले आहेत

मोठा दिलासा: शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाला स्थगिती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी (Relief for teaching and non-teaching employees) महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून (School Education Department) शिक्षक समायोजनाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष वर्ष २०२५-२६च्या (Academic Year Year 2025-26) संचमान्यतेनंतरच समायोजनाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे राज्यभरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

राज्यातील शाळांतील शिक्षकांच्या समायोजनामुळे अनेक शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर आता  शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी संचमान्यता स्थगितीबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना परिपत्रकाद्वारे निर्देश दिले आहेत. शिक्षक समायोजनाबाबत शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख सभा अशा संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

हेही वाचा - मास्तराला बाईचा नाद भोवला; नातेवाईकांनी धु धु धुतला..

न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर, १५ मार्च २०२५ रोजीच्या संचमान्यतेनुसार राज्यातील शाळांतील अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत सुधारित कार्यपद्धतीचा अवलंब करुन समायोजन प्रक्रिया राबवून उर्वरित रिक्त पदांचा तपशिल, अतिरिक्त कर्मचारी यादी (रिक्त पदांचा प्रवर्ग, विषय, अनुदानाचा, व्यवस्थापन प्रकारासह) संचालनालयास सादर करण्याबाबत २० नोव्हेंबर रोजीच्या पत्राद्वारे क्षेत्रिय अधिकाऱ्यांस कळवण्यात आले होते. मात्र, २०२५-२६ च्या ऑनलाइन संच मान्यतेबाबतची संकेतस्थळावरील कार्यवाही अंतिम टप्यात असल्याने, तसेच २०२४-२५ मधील संचमान्यतेनुसार अतिरिक्त झालेले शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया डिसेंबर, २०२५ मध्ये राबवणे, २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया, संचमान्यता प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा करावी लागणार आहे.

पुन्हा पुन्हा समायोजन प्रक्रिया राबवण्याऐवजी सन २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसारच समायोजन प्रक्रिया करणे योग्य होणार आहे. त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय स्तरावरून २० नोव्हेंबर रोजीच्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याच्या पत्राला स्थगिती देण्यात येत आहे. तसेच सन २०२५-२६ च्या संचमान्यता प्रसिद्ध झाल्यानंतर निश्चित केल्या कार्यपद्धतीनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे, असे शिक्षण आयुक्तांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.