आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स अंतर्गत 723 रिक्त पदांची भरती सुरू
उपलब्ध पदांमध्ये मटेरियल असिस्टंट, ज्युनियर ऑफिस असिस्टंट, सिव्हिल मोटर ड्रायव्हर, टेली ऑपरेटर, फायरमन, सुतार, पेंटर, एमटीएस आणि ट्रेड्समन यांसारख्या एकूण 723 पदांचा समावेश आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
भारतीय सैन्यात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. संरक्षण मंत्रालयाने अंतर्गत आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये (AOC) गट 'C' मधील विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती जाहीर (Recruitment process announced) केली आहे . उपलब्ध पदांमध्ये मटेरियल असिस्टंट, ज्युनियर ऑफिस असिस्टंट, सिव्हिल मोटर ड्रायव्हर, टेली ऑपरेटर, फायरमन, सुतार, पेंटर, एमटीएस आणि ट्रेड्समन यांसारख्या एकूण 723 पदांचा समावेश आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागले. आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्सच्या https://aocrecruitment.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवार अर्ज भरू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 डिसेंबरपर्यंत देण्यात आली आहे. ज्युनिअर ऑफिस असिस्टंट , टेली ऑपरेटर , फायरमन आणि इतर पदांसाठी संगणक कौशल्यासह किमान 10 वी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. सिव्हिल मोटर ड्रायव्हर (ओजी) सारख्या पदांसाठी 10 वी उत्तीर्ण पात्रतेसह वैध ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया
प्रथम अधिकृत संकेतस्थळ aocrecruitment.gov.in ला भेट द्या. ताज्या बातम्या विभागाखालील “ऑनलाइन अर्ज करा” लिंकवर क्लिक करा. तुमची मूलभूत माहिती भरून तुमची नोंदणी करा. तुमच्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन करा आणि अर्ज भरा. मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज फी भरा. फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील वापरासाठी प्रिंटआउट घ्या.
AOC भरती 2024 मध्ये निवड प्रक्रियेचे चार टप्पे आहेत. शारीरिक तंदुरुस्ती आणि मोजमापांचे मूल्यांकन करण्यासाठी PE&MT, ज्ञान आणि योग्यता तपासण्यासाठी लेखी परीक्षा, पात्रतेची पुष्टी करण्यासाठी दस्तऐवज पडताळणी आणि संपूर्ण फिटनेस सुनिश्चित करण्यासाठी वैद्यकीय तपासणी. या टप्प्यातील कामगिरीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते.