SET EXAM :सेट परीक्षेची प्राथमिक 'Answer kay' प्रसिद्ध

सेट परीक्षा विभागातर्फे सेट परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका अधिकृत पोर्टल setexam.unipune.ac.in ne वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

SET EXAM :सेट परीक्षेची प्राथमिक 'Answer kay' प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) सेट परीक्षा विभागातर्फे (SET Examination Section)महाराष्ट्र व गोव्यातील उमेदवारांसाठी 7 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका (Interim Answer Key) setexam.unipune.ac.in ne या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांना येत्या 9 मे पर्यंत सूचना व तक्रारी सादर करता येणार आहेत, विद्यापीठातर्फे याबाबतचे परिपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.

विद्यापीठातर्फे एकूण १७ शहरातील २८९ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर आता परीक्षेच्या प्राथमिक उत्तरतालिकेबाबत तक्रारी स्वीकारण्यास सुरूवात करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांनी सर्व सूचनांचे काटेकोरपणे वाचून करावे.तसेच दिलेल्या सूचनेप्रमाणे प्राथमिक उत्तरतालिकेबाबत काही सूचना किंवा तक्रार असल्यास ऑनलाईन पध्दतीने आवश्यक त्या शुल्कासह अर्ज करावेत. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने जमा करावेत, अर्ज व्यक्तीशः किंवा टपालामार्फत स्विकारले जाणार नाहीत.

विद्यापीठातर्फे उत्तरतालिकेची लिंक ९ मे रोजी  संध्याकाळी ६ वाजेपर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. ९ मे नंतर उत्तरतालिकेबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी, असे विद्यापीठातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

अशी चेक करा Answer Kay 

सर्वात आधी MH SET चे अधिकृत पोर्टल setexam.unipune.ac.in ne वर जा. होमपेजवर Maharashtra SET 2024 provisional answer key यादीची लिंक शोधा आणि क्लिक करा. आता A,B,C,D या सेट नंबर्सपैकी तुमचा सेट नंबर निवडा आणि उघडा. यानंतर MH-SET Answer की वरील उत्तरे आणि रिस्पॉन्स शीट वरील उत्तरे पडताळून पाहा. यानंतर Maharashtra SET 2024 Answer की ची कॉपी सेव्ह करा.