NCERT च्या पुस्तकावरून पुन्हा वाद; इराणच्या धार्मिक नेत्याला म्हटले एवील 

NCERT ने यावर्षी इयत्ता 6 वी साठी नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये जनरल नॉलेज च्या पुस्तकात इराणचे धार्मिक नेते अयातुल्ला खोमेनी यांना जगाने आतापर्यंत पाहिलेला सर्वात दुष्ट व्यक्ती म्हटले आहे.

NCERT च्या पुस्तकावरून पुन्हा वाद; इराणच्या धार्मिक नेत्याला म्हटले एवील 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 NCERT च्या नवीन पुस्तकामुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहे. इयत्ता 6 वी च्या सामान्य ज्ञानाच्या पुस्तकात, इराणचे धार्मिक नेते अयातुल्ला खोमेनी (Iran's religious leader Ayatollah Khomeini)यांना एवील म्हणजे दुष्ट (Evil)असे म्हटले आहे. यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.

NCERT ने यावर्षी इयत्ता 6 वी साठी नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये जनरल नॉलेज च्या पुस्तकात इराणचे धार्मिक नेते अयातुल्ला खोमेनी यांना जगाने आतापर्यंत पाहिलेला सर्वात दुष्ट व्यक्ती म्हटले आहे.

यावर स्पष्टीकरण देताना NCERT ने म्हटले आहे की, " ही दिशाभूल करणारी माहिती NCERT च्या कॉपीराइट परवानगीशिवाय प्रकाशित करण्यात आली आहे. हे पुस्तक अक्यूबर बुक्स इंटरनॅशनल या प्रकाशकाने प्रकाशित केले होते, ज्याबद्दल NCERT ला माहिती नव्हती. एनसीईआरटीच्या म्हणण्यानुसार याप्रकरणी लवकरच कारवाई केली जाईल.

 एनसीईआरटीने शाळांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. विद्यार्थ्यांना कोणतेही पुस्तक देण्यापूर्वी त्यांनी दिलेल्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात कोणताही गैरसमज होणार नाही याची खात्री करा, असा सल्ला NCERT ने शाळांना दिला आहे. दरम्यान NCERT ने काही दिवसांपूर्वीच NCERT च्या नावाने बनवत पुस्तके विकणाऱ्यावर कारवाई केली होती.