मुक्त विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू, ऑनलाईन अर्जासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांतर्गत असलेल्या अभ्यासक्रमाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २० जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. यासाठी इच्छुकांना १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार असून, शैक्षणिक सत्र जानेवारी २०२५ साठी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.

मुक्त विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू, ऑनलाईन अर्जासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) विविध विद्याशाखांतर्गत असलेल्या अभ्यासक्रमाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २० जानेवारीपासून सुरू (Online admission process begins) करण्यात आली आहे. यासाठी इच्छुकांना १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार असून, शैक्षणिक सत्र जानेवारी २०२५ साठी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण व विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बी. एड. (सेवांतर्गत), बी. एड. (विशेष) तसेच विज्ञान विद्याशाखेच्या शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांसाठी ही प्रवेश प्रक्रिया असल्याचे माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे (Vice Chancellor Dr. Sanjeev Sonawane) यांनी दिली. 

विद्यापीठाच्या विविध ७१ अभ्यासक्रमासाठी ही प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाकडून राबविली जात आहे. यामध्ये २७ प्रमाणपत्र अभ्यासक्रम, २० पदविका, ८ पदवी व  १६पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही फक्त ऑनलाइन पद्धतीने राबविली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अर्जाच्या शुल्काचा भरणा देखील ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. 

अतिरिक्त पदवीप्राप्ती शक्य नियमित पदवीसोबत दूरशिक्षणाद्वारे अधिकची पदवी विद्यार्थ्यांना घेता येणार असून, १५ फेब्रुवारीपर्यंत यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. ycmou.ac.in किंवा ycmou.digitaluniversity.ac या वेबसाइटवरून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार असल्याची महिती विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड यांनी दिली.