विद्यापीठाच्या दुरुस्थ एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशास सुरूवात

विद्यार्थ्यांना ऑनलाइन व दुरुस्त पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मोठी संधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशाळेतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या दुरुस्थ एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशास सुरूवात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत(Savitribai Phule Pune University) एमबीए अभ्यासक्रम (MBA Course) दुरुस्थ तसेच ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आला आहे.या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षा अर्थात सीईटी (CET)घेतली जाणार असून सीईटी परीक्षेच्या नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे. विद्यार्थी येत्या 24 जानेवारीपर्यंत नोंदणी करू शकतात,असे विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगचे संचालक डॉ.वैभव जाधव यांनी सांगितले.

शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेऊन नियमितपणे एमबीए करणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन व दुरुस्त पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मोठी संधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशाळेतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या http://unipune.ac.in/SOL/admission2024.html या संकेस्थळावर विद्यार्थी परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात.

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम तसेच cet प्रवेश प्रक्रियेची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. सीईटी परीक्षा ऑनलाईन प्रॉक्टर्ड पद्धतीने घेतली जाणार आहे. तर ही परीक्षा एक तासासाठी असेल. एम सी क्यू पद्धतीचे 50 प्रश्न परीक्षेसाठी विचारले जातील. प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण असतील, असेही विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे