राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 'कोडिंग आणि रोबोटिक्स'चा ऑनलाईन अभ्यासक्रम खुला
मुंबईतील ९वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी मिळून ५ तासांचा मोफत ऑनलाईन अभ्यासक्रम तयार केला आहे. जो महाराष्ट्रातील युवकांना कोडिंग आणि रोबोटिक्स शिववण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या (DVET) वतीने राज्यभरातील १ हजार ४९ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (Industrial Training Institute) विद्यार्थ्यांसाठी कोडिंग आणि रोबोटिक्स (Coding and robotics courses) या विषयावर राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुंबईतील ९वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी मिळून ५ तासांचा मोफत ऑनलाईन अभ्यासक्रम (Free online courses) तयार केला आहे. जो महाराष्ट्रातील युवकांना कोडिंग आणि रोबोटिक्स शिववण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister of Industrial Development Mangalprabhat Lodha) यांनी दिली आहे.
मंत्री लोढा यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेतली. उपक्रमाचे कौतुक करत त्यांचे ज्ञान हजारो गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी प्रेरणा दिली. यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष वेबिनार आयोजित करण्यात आला. वेबिनारमध्ये ‘कोडिंग आणि रोबोटिक्स’ क्षेत्राचे महत्त्व, संधी आणि भविष्यातील रोजगार यावर चर्चा करण्यात आली. टीम सिग्मा या विद्यार्थ्यांनी वेबिनारमध्ये या क्षेत्रातील संधींचे सखोल मार्गदर्शन केले.
कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले, “ही मुले पुण्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आहेत आणि त्यानंतर अमेरिकेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत, याचा मला अभिमान आहे. कोडिंग आणि रोबोटिक्ससारख्या नाविन्यपूर्ण क्षेत्रात आजची युवा पिढी सक्रिय सहभाग घेत आहे.
विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांनी स्वतः संकल्पना तयार करून राज्यभरातील ITI विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी उचलली आहे. महाराष्ट्र सरकारच्या पुढाकारामुळे, राज्यभरातील विद्यार्थ्यांना कोडिंग आणि रोबोटिक्सचे प्राथमिक शिक्षण आता सहज उपलब्ध झाले असल्याचे मत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.
eduvarta@gmail.com