तरुणांसाठी नौदलात नवीन भरती जाहीर

लघु सेवा आयोगांतर्गत माहिती तंत्रज्ञान कार्यकारी शाखेत होणाऱ्या या भरतीसाठी केवळ अविवाहित पात्र महिला आणि पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात.

तरुणांसाठी नौदलात नवीन भरती जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नौदलात भरती (Navy recruitment ) होऊन देशसेवा करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी नौदलात नवीन भरती जाहीर झाली आहे.भारतीय नौदलाने SSC IT एक्झिक्युटिव्हची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली होती. आता नौदलाच्या www.joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटवर विविध रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 ऑगस्ट आहे.

लघु सेवा आयोगांतर्गत माहिती तंत्रज्ञान कार्यकारी शाखेत होणाऱ्या या भरतीसाठी केवळ अविवाहित पात्र महिला आणि पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. एक्झिक्युटिव्ह आयटी पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना दहावीत इंग्रजीत किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे. 12 वीत  किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारांना एमएससी/बीई/बीटेक/एमटेक/एमसीए/बीसीए/बीएससी पदवी असावी. 

या भरतीस अर्ज करण्यासाठी उमेदवारांचा जन्म  जानेवारी 2000 ते 1 जुलै 2005 दरम्यान असावा. राखीव प्रवर्गासाठी उच्च वयोगटात सूट दिली जाते. निवड- उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार निवडले जाईल. यानंतर त्यांना एसएसबी मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

या भरतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना थेट सब लेफ्टनंट म्हणून नियुक्त केले जाईल. उमेदवारांना भारतीय नौदल अकादमीमध्ये ६ आठवडे प्रशिक्षण मिळेल. उमेदवार नौदलाच्या अधिकृत वेबसाइटवरून या पदावर दिलेले वेतन आणि भत्ते यांची माहिती तपासू शकतात. भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही प्रकारे अपात्र आढळल्यास, ते नाकारले जातील, असा इशारा भारतीय नौदलाने दिला आहे.