भारतीय नौदलात विविध पदांसाठी भरती 

फॉर्म भरण्यासाठी, उमेदवारांनी किमान 60 टक्के गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि भौतिकशास्त्रातील BE/B.Tech/MSc/ पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी.

भारतीय नौदलात विविध पदांसाठी भरती 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 भारतीय नौदलाने (Indian Navy)शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) जून 2025 (AT 25) अंतर्गत सामान्य सेवा, हवाई वाहतूक नियंत्रण, पायलट यासह विविध पदांसाठी भरतीसाठी (Recruitment for various posts)अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया येत्या14 सप्टेंबरपासून सुरू होणार  असून  इच्छुकांना येत्या 29 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. उमेदवार नौदलाच्या www.joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

नौदलाची ही रिक्त पदे कार्यकारी शाखा, शिक्षण शाखा आणि तांत्रिक शाखेसाठी  आहेत. नौदलाच्या या भरतीसाठी महिला आणि पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. फॉर्म भरण्यासाठी, उमेदवारांनी किमान 60 टक्के गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि भौतिकशास्त्रातील BE/B.Tech/MSc/ पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. उमेदवार भरतीच्या अधिकृत अधिसूचनेमधून पात्रतेशी संबंधित इतर तपशील तपासू शकतात. 

 या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांची किमान जन्मतारीख 2 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान असावी. तर काही पदांवर 2 जुलै 2001 ते 1 जुलै 2004 आणि 2006 ही मुदतही निश्चित करण्यात आली आहे. सर्व श्रेणीतील उमेदवार कोणत्याही परीक्षा शुल्काशिवाय या पदांसाठी फॉर्म भरू शकतात. अर्ज  केल्यानंतर उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. त्यानंतर त्यांना SSB मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

नौदलातील या भरतीसाठी केवळ अविवाहित उमेदवारच अर्ज करण्यास पात्र आहेत. ज्या उमेदवारांना नौदलात थेट अधिकारी स्तरावर नोकरी हवी आहे, त्यांच्यासाठी सब लेफ्टनंट बनण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी, उमेदवार नौदलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.  या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर, उमेदवारांना थेट सब लेफ्टनंट पदावर नियुक्त केले जाईल. या पदासाठी प्रारंभिक वेतन 56 हजार 100 रुपये निश्चित करण्यात आले आहे.