मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी (पेट) परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ
विद्यापीठाने गेल्या आठवड्यापासून पेट परीक्षेचे अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे. याआधी देण्यात आलेली पेट परीक्षा प्रवेश अर्ज सादर करण्याची तारीख संपुष्टात आल्यानंतर आता नव्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे त्यानुसार उमेदवारांना उद्यापर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) बहुप्रतीक्षित पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) (Ph.D. Pre-Entry Examination (PET)) अर्ज भरण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ (Deadline extended till November 4 for submission of applications) देण्यात आली आहे. आता ही परीक्षा १७ नोव्हेंबरला घेतली जाणार आहे. विद्यापीठाने गेल्या आठवड्यापासून पेट परीक्षेचे अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे. याआधी देण्यात आलेली पेट परीक्षा प्रवेश अर्ज (Pet Exam Admission Form) सादर करण्याची तारीख संपुष्टात आल्यानंतर आता नव्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे त्यानुसार उमेदवारांना उद्यापर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
पेट परीक्षा ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठाने वेळापत्रकही जाहीर केले आहे. दिवाळीच्या सुट्ट्या आणि आणखी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी मिळावी यासाठी विद्यापीठाने मुदतवाढ केली आहे. आता ४ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येईल. पेट परीक्षा १७ नोव्हेंबर रोजी विविध केंद्रांवर सकाळी १०:३० ते दुपारी १२:३० या कालावधीत घेतली जाणार आहे. परीक्षार्थीनी ३० मिनिटांपूर्वी केंद्रांवर उपस्थित राहण्याचे आवाहन परीक्षा मंडळाने केले आहे.
पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि अद्याप अर्ज भरण्यासाठी बाकी असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीनुसार पेट परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर वेळापत्रक पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. ऑनलाइन पेट परीक्षेसाठी ७६ विषय आहेत. गेल्या पेट परीक्षेत सर्वसाधारण ६ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.