MPSC कडून मोठी भरती; गट-क संवर्गातील ९३८ पदांसाठी 'या' दिवशी होणार परीक्षा..

महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा दोन टप्प्यात पार पडणार आहे. संयूक्त पूर्व परीक्षा आणि त्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जाईल. पूर्व परीक्षा 100 गुणांसाठी असेल तर संयुक्त मुख्य परीक्षा 400 गुणांची असेल. लिपिक टंकलेखक आणि करसहायक पदासाठी टंकलेखन कौशल्य याचणी द्यावी लागणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 394 रुपये पूर्व परीक्षेचे शुल्क असेल.

MPSC कडून मोठी भरती; गट-क संवर्गातील ९३८ पदांसाठी 'या' दिवशी होणार परीक्षा..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. एमपीएससीकडून महाराष्ट्र गट -क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची (Maharashtra Group-C Services Combined Preliminary Examination) जाहिरात प्रसिद्ध (Advertisement published) केली आहे. या जाहिरातीद्वारे 938 पदांच्या भरतीसाठी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 4 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. एमपीएससीकडून उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक आणि लिपीक टंकलेखक पदाच्या (Industrial Inspector, Technical Assistant, Tax Assistant and Clerk Typist Posts) भरतीसाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. उद्योग निरीक्षक पदाच्या 9 जागा भरल्या जाणार आहेत. तांत्रिक सहायक पदाच्या 4 जागा, कर सहायक 73 जागा आणि लिपिक टंकलेखक पदाच्या 852 जागांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

त्रिभाषा धोरण समितीचा छ. संभाजीनगरचा दौरा पूरस्थितीमुळे रद्द..

महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुरुवात झाली असून अर्ज सादर करण्याचा अंतिम मुदत 27 ऑक्टोबर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेला अर्ज करणारा उमेदवार भारतीय असणे आवश्यक आहे. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. उद्योग निरीक्षक पदासाठी उमेदवाराकडे सांविधिक विद्यापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा दोन टप्प्यात पार पडणार आहे. संयूक्त पूर्व परीक्षा आणि त्यानंतर मुख्य परीक्षा घेतली जाईल. पूर्व परीक्षा 100 गुणांसाठी असेल तर संयुक्त मुख्य परीक्षा 400 गुणांची असेल. लिपिक टंकलेखक आणि करसहायक पदासाठी टंकलेखन कौशल्य याचणी द्यावी लागणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 394 रुपये पूर्व परीक्षेचे शुल्क असेल. तर मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस आणि अनाथ प्रवर्गासाठी 294 रुपये तर माजी सैनिकांसाठी 44 रुपये शुल्क असेल. मुख्य परीक्षेसाठी 544 रुपये खुल्या प्रवर्गासाठी, मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस आणि अनाथ प्रवर्गासाठी 344 रुपये तर माजी सैनिकांसाठी 44 रुपये परीक्षा शुल्क असेल.