बारावी उत्तीर्णांना हवाई दलात नोकरीची संधी, अग्निवीर वायू पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू 

भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर वायु सेवन ०१/२०२६ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार भारतीय दलाचे अधिकृत संकेतस्थळ https://shorturl.at/QuePM वर जाऊन अर्ज करू शकतात.

बारावी उत्तीर्णांना हवाई दलात नोकरीची संधी, अग्निवीर वायू पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारतीय सैन्यात नोकरी करण्याची इच्छा असणार्‍या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आले आहे. भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर वायु (Agnivir Vayu Recruitment) सेवन ०१/२०२६ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार भारतीय दलाचे अधिकृत संकेतस्थळ https://shorturl.at/QuePM वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ जानेवारीपर्यंत (Application deadline 27th January) असणार आहे. 

विज्ञान शाखेतील गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयासह 12 वी परीक्षेत किमान 50% गुणांसह उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकीमधील डिप्लोमा कोर्स किंवा दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असलेले उमेदवार यासाठी पात्र असणार आहेत. या भरती मोहिमेत सहभागी होणाऱ्या उमेदवाराचे वय १७.५ ते २१ या कालावधी दरम्यान आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००५ ते १ जुलै २००८ या कालावधीत झालेला असावा. तसेच भरती नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांना ५५० रुपये परीक्षा शुल्क आकारला जाणार असून त्यामध्ये अधिक जीएसटी ऑनलाइन भरावे लागेल. उमेदवार क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ट किंवा इंटनरनेट बँकिंगद्वारे परीक्षा शुल्क भरू शकतात. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुण या भरती प्रक्रियेत सहभागी होऊन आपले स्वप्न साकार करू शकतील. महत्त्वाची बातमी आहे. या भरती प्रक्रियेविषयी अधिक तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.