लाचप्रकरणी प्राध्यापिकेची गाईडशीप रद्द; विद्यार्थी केले दुसऱ्या गाईडकडे स्थलांतरीत 

लाचप्रकरणी प्राध्यापिकेची गाईडशीप रद्द; विद्यार्थी केले दुसऱ्या गाईडकडे स्थलांतरीत 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पीएच.डी. (PHD)प्रबंध सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे लाच मागणाऱ्या सांगावी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील प्राध्यापिकेची (Professor at Baburaoji Gholap College)गाईडशीप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University)रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच या प्राध्यापिकेकडे मार्गदर्शन घेणाऱ्या आठही विद्यार्थ्यांना दुसऱ्या गाईडकडे स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून लाच प्रकरणी गाईडवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. विद्यापीठातर्फे लवकरच याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे,असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.  

 बाबुरावराजी घोलप महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आणि पीएच.डी.मार्गदर्शक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. शकुंतला माने (Dr. Shakuntala Mane)यांनी विद्यार्थ्यांचा  पीएच.डी.चा शोध प्रबंध विद्यापीठाकडे मान्यतेसाठी सादर करण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र, संबंधित विद्यार्थ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबबात तक्रार केल्यानंतर एसीबीने सापळा रचून माने यांच्यावर कारवाई केली. त्यावर सर्च क्षेत्रातून टीका झाली. त्यानंतर विद्यापीठाने संबंधित प्राध्यापिका डॉ. माने यांची गाईडशीप रद्द करण्याचा निर्णय घेतला . 

विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार माने यांच्याकडे आठ विद्यार्थी पीएच.डी.चे मार्गदर्शन घेत होते. या आठही विद्यार्थ्यांना विद्यापीठाने दुसऱ्या गाईडकडे स्थलांतरीत केले आहे. त्यामुळे केवळ एकाच नाही तर माने यांच्याकडे असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन मार्गदर्शक मिळाले आहेत.

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर म्हणाले, विद्यापीठातर्फे बाबूरावजी महाविद्यालयाला पत्र पाठवण्यात आले असून संबंधित प्राध्यापिकेकडे असणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या गाईडकडे स्थलांतरित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.