मेडिकल विद्यार्थ्यांच्या इंटरशिपच्या विद्यावेतनात वाढ; मंत्रिमडळाचा निर्णय 

इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ हजार रुपयांऐवजी 18 हजार रुपये विद्या वेतन मिळणार आहे.

मेडिकल विद्यार्थ्यांच्या इंटरशिपच्या  विद्यावेतनात वाढ; मंत्रिमडळाचा निर्णय 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या (Intership students) विद्या वेतनात वाढ (Increase in tuition fees) करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात (Decision of State Cabinet) मंगळवारी घेण्यात आला. त्यामुळे इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ हजार रुपयांऐवजी 18 हजार रुपये (18 thousand rupees) विद्या वेतन मिळणार आहे.

शासकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असताना रुग्णालयात इंटर्नशिप करावी लागते. त्याबदल्यात विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाते. या विद्यावेतनात वाढ करावी, अशी मागणी विविध संघटनांकडून केली जात होती, अखेर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्याचप्रमाणे राज्यात सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्याबाबत निर्णय घेतला गेला. तसेच भुदरगड तालुक्यात नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापन करण्याबाबत निर्णय झाला.