आयआयटी दिल्लीने नवीन एमए प्रोग्रामची केली घोषणा ; 20 मार्चपासून नोंदणी सुरु

या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विविध सैद्धांतिक आणि पद्धतशीर पध्दतींशी ओळख करून देणे आहे

आयआयटी दिल्लीने नवीन एमए प्रोग्रामची केली घोषणा ; 20 मार्चपासून नोंदणी सुरु

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली (IIT Delhi) ने काही दिवसांपुर्वी नवीन पदव्युत्तर-स्तरीय अभ्यासक्रम लॉन्च करण्याची घोषणा (News PG Program) केली. नवीन अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक सत्रापासून (academic session 2024) सुरू होईल आणि यासाठी 20 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान अर्ज नोंदणी करता येईल. उमेदवार hss.iitd.ac या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात.

नव्या अभ्यासक्रमातील पदवीधर देखील त्यांच्या संशोधनाची आवड वाढवण्यासाठी आयआयटी दिल्लीतील डॉक्टरेट प्रोग्राम किंवा कोणत्याही देशातील इतर डॉक्टरेट प्रोग्राममध्ये सामील होण्यास पात्र असतील. या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विविध सैद्धांतिक आणि पद्धतशीर पध्दतींशी ओळख करून देणे आहे. ज्यामुळे त्यांना आजच्या जगाच्या जटिलतेचे समीक्षक विश्लेषण करता येईल.

अर्ज कोण करू शकतो

BA पदवी असलेल्या पदवीधरांनी किमान 55% गुण किंवा समतुल्य CGPA प्राप्त करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, बी.टेक., बीएस्सी, बी.कॉम., बी.डेस., बी.एड. यासारख्या इतर प्रवाहातील पदवीधर. त्यांच्या संबंधित ग्रॅज्युएशन प्रोग्राममध्ये प्रथम श्रेणी प्राप्त करणे आवश्यक आहे. SC/ST/PwD श्रेणीतील उमेदवारांसाठी, पात्रता पदवीसाठी आवश्यक असलेल्या किमान कामगिरीमध्ये 5% सूट आहे. आयआयटी दिल्लीचे बी.टेक. अडव्हान्सचे विद्यार्थी अर्ज करू शकतात.