इस्रोमध्ये ६० हून अधिक पदांची भरती

इस्रोने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार, एकूण ६३ रिक्त पदे भरली जातील. ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्समधील २२ पदे, मेकॅनिकलमधील ३३ पदे, संगणक शास्त्रातील ८ पदे समाविष्ट आहेत. या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना शास्त्रज्ञ/अभियंता 'एससी' म्हणून नियुक्त केले जाईल.

इस्रोमध्ये ६० हून अधिक पदांची भरती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर देशाची सेवा करत अंतराळ जगात योगदान देऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही महत्वाची आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) इस्रो ने शास्त्रज्ञ/अभियंता 'एससी' पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. (Recruitment process has started for the posts of Scientist/Engineer) इच्छुक आणि पात्र उमेदवार www.isro.gov.in ला भेट देऊन अर्ज भरू शकतात.

इस्रोने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार, एकूण ६३ रिक्त पदे भरली जातील. ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्समधील २२ पदे, मेकॅनिकलमधील ३३ पदे, संगणक शास्त्रातील ८ पदे समाविष्ट आहेत. या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना शास्त्रज्ञ/अभियंता 'एससी' म्हणून नियुक्त केले जाईल.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, मेकॅनिकल किंवा संगणक विज्ञान विषयात बीई/बीटेक पदवी असणे आवश्यक आहे आणि त्यात किमान ६५% गुण आवश्यक आहेत. याशिवाय, उमेदवाराला GATE स्कोअर असणे देखील अनिवार्य आहे.

या पदांसाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल २८ वर्षे असावे. राखीव प्रवर्गांना नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. सर्व श्रेणीतील पुरुष आणि महिला उमेदवारांना २५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. हे शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे जमा करता येईल. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.
अर्ज कसा भरावा ?

* सर्व प्रथम उमेदवारांनी ISRO च्या अधिकृत वेबसाइट www.isro.gov.in ला भेट द्या.
* त्यानंतर 'करिअर' विभागात जा आणि भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
* त्यानंतर तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते निवडा आणि सर्व आवश्यक माहिती भरा. 
* आता अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
* शेवटी, उमेदवारांनी अर्ज डाउनलोड करावा आणि प्रिंटआउट घ्यावे.