ICSE Result 2024 : ठाण्याच्या रेहान सिंहचा ICSE बोर्डात डंका..

रेहान सिंह ट्यूशनला न जाता त्याने स्व-अभ्यास केला आणि ICSE 12 वी बोर्डामध्ये संपूर्ण देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

ICSE Result 2024 : ठाण्याच्या  रेहान सिंहचा ICSE बोर्डात डंका..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

काउंसिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्सामिनेशन (CISCE) बोर्डाचा (Result 2024) निकाल जाहीर झाला आहे. या निकालात ठाणेकरांना मानाचे पान मिळाले आहे. कारण ठाणे येथील वर्तक नगर परिसरात राहणारा रेहान सिंह (Rehan Singh) हा बोर्डाच्या परीक्षेत देशात अव्वल ठरला आहे. रेहान सिंह याला बारावी आयसीएसई बोर्डात 99.75 टक्के गुण मिळाले आहे. रेहानला 400 पैकी 399 गुण मिळाले आहेत. रेहान सिंहने खासगी शिकवणीला न जाता  स्व-अभ्यास केला आणि ICSE 12 वी बोर्डामध्ये (12th Boards) संपूर्ण देशात प्रथम क्रमांक मिळविला. 

रेहानने म्हणाला, मी ठाण्यातील सुलोचना देवी सिंघानिया हायस्कूलमध्ये शिकत आहे. मी शाळेतच  मन लावून अभ्यास करायचो. माझ्या अभ्यासाचा असा काही निश्चित वेळ नव्हता. मुलांना टिप्स देताना रेहान म्हणाला, जेव्हाही तुम्ही अभ्यासाला बसता तेव्हा पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करा. तसेच कोणत्याही परिस्थितीत दररोज काही तास अभ्यास केलाच पाहिजे. मी दिवसातून २ ते ३ तास अभ्यास करायचो. मात्र, संपूर्ण मन लावून अभ्यास करत होतो. 

रेहानचे वडील प्रसून सिंह म्हणाले, रेहान दिवसातून २ ते ३ तास ​​अभ्यास करायचा; आम्हाला त्याच्याकडून जास्त गुणांची अपेक्षा नव्हती. अभ्यासाबाबत आम्ही त्याच्यावर कधीच दबाव टाकला नाही, त्याला वाटेल तेव्हा तो अभ्यास करायचा आणि आज त्याने संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक पटकावला. हे त्याचे श्रेय आहे.मुलांनी अभ्यासाचा  ताण घेऊ नये आणि मी पालकांना विनंती करतो की, इतर पालकांनी  मुलांवर अभ्यासाबाबत जास्त दबाव टाकू नये. 

रेहानच्या आई अनिता सिंग म्हणाल्या, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत त्याच्या सर्व गरजा आम्ही पूर्ण करायचो. आज त्याचा अभ्यास पूर्ण झाला नाही हे आम्हाला त्याला कधीच सांगावे लागले नाही, तो स्वतःचा अभ्यास पूर्ण करायचा. जे पालक आपल्या मुलांवर अभ्यासाबाबत दबाव टाकतात, त्यांनी तसे करू नये, तर मुलांना थोडी सवलत देण्याचाही प्रयत्न करावा.