नेट परीक्षेचे हॉल तिकीट डाऊनलोड करून घेतले ? 

उमेदवारांना परीक्षेपूर्वी किंवा दरम्यान परीक्षा हॉल सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही, कोणतेही लिखित साहित्य, कागद, पर्स किंवा कोणत्याही प्रकारची बॅग आणण्याची परवानगी नाही, परीक्षा हॉलमध्ये मोबाईल फोन, इयरफोन, टॅब्लेट, स्मार्ट घड्याळे इत्यादी इलेक्ट्रॉनिक उपकरणांना परवानगी नाही,

नेट परीक्षेचे हॉल तिकीट डाऊनलोड करून घेतले ? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (UGC)घेतल्या जाणा-या आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (NTA)आयोजित करण्यात येणाऱ्या डिसेंबर महिन्यातील नेट परीक्षेचे (NET EXAM) हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे.येत्या ६ ते १४ डिसेंबर या कालावधीत देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी हे हॉल तिकीट सोबत बाळगणे बंधनकारक आहे. 

हेही वाचा : तृतीयपंथीय विद्यार्थ्यांची पूर्ण फी विद्यापीठ भरणार

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वर हॉल तिकीट उपलब्ध करून दिले आहे. उमेदवार अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून UGC-NET डिसेंबरचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.हे हॉल तिकीट  ६, ७ आणि ८ डिसेंबर या कालावधीसाठी वैध असेल.
यूजीसीच्या अधिसूचनेनुसार, नेटच्या परीक्षा दोन सत्रामध्ये घेतल्या जातील. परीक्षा सकाळच्या सत्रात  सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुसरच्या सत्रात दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या वेळेत चालेल. पहिल्या सत्रासाठी उमेदवारांना सकाळी ८.३० पर्यंत आणि दुसऱ्या शिफ्टसाठी दुपारी २.३० पर्यंत परीक्षा हॉलमध्ये पोहोचावे लागेल, असे निर्देश युजीसीकडून देण्यात आले आहेत. 

उमेदवारांना परीक्षेपूर्वी किंवा दरम्यान परीक्षा हॉल सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही, कोणतेही लिखित साहित्य, कागद, पर्स किंवा कोणत्याही प्रकारची बॅग आणण्याची परवानगी नाही, परीक्षा हॉलमध्ये मोबाईल फोन, इयरफोन, टॅब्लेट, स्मार्ट घड्याळे इत्यादी इलेक्ट्रॉनिक उपकरणांना परवानगी नाही, परीक्षा हॉलमध्ये खाण्यापिण्यास मनाई आहे, कागदपत्र पडताळणीसाठी परीक्षेच्या वेळेच्या अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचावे, अशा सूचनाही UGC ने दिल्या आहेत.