फॅन्सी हेअर कट मुळे विद्यार्थ्यांना प्री - बोर्ड  परीक्षा देण्यापासून रोखले 

रांचीमधील एका शाळेचा नियम 

फॅन्सी हेअर कट मुळे विद्यार्थ्यांना प्री - बोर्ड  परीक्षा देण्यापासून रोखले 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी ठराविक हेअर कट (hair cut)ठेवावा, मुलींनी दोन वेण्या, केस छोटे असतील तर केसात व्यवस्थित बँड लावावा हा नियम सर्वसाधारण पणे सर्व शाळांमध्ये लागू असतो. आणि हा नियम मोडणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षा, फाईन भरणे, (Punishment, payment of fines to the student) जास्तीचा गृहपाठ करायला लावणे,  असे प्रकार घडत असतात. पण रांची येथील एका शाळेने फॅन्सी हेअरकट केलेल्या विद्यार्थ्यांना प्री-बोर्ड परीक्षा देण्यापासून रोखले (Students were prevented from giving pre-board exams) आहे.

रांची येथील सेंट जेविअर स्कुल ने १० वी च्या ५२ विद्यार्थ्यांना प्री बोर्ड परीक्षा देण्यापासून रोखले आहे. यामुळे शाळा प्रशासनावर पालकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. शाळेच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, विद्यार्थ्यांनी फॅन्सी हेअरस्टाइल ठेवल्या आहेत, जे शाळेच्या शिस्तीच्या विरुद्ध आहे.  गणवेशासह सर्व ड्रेस कोडबाबत सूचना आधीच जारी करण्यात आल्या आहेत. त्याचे उल्लंघन अजिबात योग्य नाही.

हेही वाचा : पुण्यात राष्ट्रीय हॅकाथॉन; विद्यार्थ्यांना चार लाखांची पारितोषिके

शनिवारी दहावीच्या विद्यार्थ्यांचा भूगोल विषयाचा पेपर होता. परीक्षा देण्यासाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांना योग्य केस कापले नसल्याने त्यांना आधी बाजूला ठेवण्यात आले आणि नंतर त्यांना परीक्षा देण्यापासून रोखण्यात आले. यामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.  "मुले नेहमीच शिस्तप्रिय असतात. या दिवसात सुट्टी असल्याने केस कापले नव्हते. अशा स्थितीत शाळेने विद्यार्थ्यांना सावध करून परीक्षेत समाविष्ट करायला हवे होते. बोर्डाच्या परीक्षेपूर्वी शाळेच्या अशा वागण्याने मुलांचे मनोबल खचते. कारवाई करण्यापूर्वी शाळेने पूर्वसूचना द्यायला हवी होती," असे पालकांचे म्हणणे आहे.